येवला - प्रत्येक गावातील गावठाण जमिनीचे मोजमाप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासाठी भूमिलेख कार्यालयाकडून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे मोजणी करण्याचे काम येवला तालुक्यातील पारेगाव येथे सुरू झाले आहे.
109 गावांचे होणार सर्वेक्षण
तालुक्यातील एकूण 109 गावातील गावठाण जमिनीचे मोजमाप करून कॅमेऱ्याच्या साह्याने सुरू केले आहे. प्रत्येक जमिनीचे आणि घराचे डिजिटल प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात येणार आहे.
डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळणार
गावठाण भागातील एकूण मोजणीसाठी संबंधित ग्रामसेवकाचीदेखील मदत घेण्यात येणार आहे. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे मोजणीनंतर प्रत्येक गावातील अंतर्गत रस्ते, घर, इतर जागा यांचे प्रॉपर्टी कार्ड बनवून जागा मालकांना दिले जाणार आहे. प्रॉपर्टी कार्डमुळे बँकेकडून कर्ज घेण्यासाठी कार्डधारकाला अधिक फायदा होणार असल्याने प्रॉपर्टी कार्डला महत्त्व प्राप्त होणार आहे.
ड्रोनने नदी, नाले, रस्ते नोंद
गावठाण भागातील नदी, नाले, रस्ते यांचीही नोंद केली जाणार असल्याची माहिती भूमिलेख उपाधीक्षक संजय राजपूत यांनी दिली आहे.