ETV Bharat / state

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात डॉ.भारती पवार विजयी

author img

By

Published : May 24, 2019, 2:11 AM IST

दिंडोरी लोकसभा भाजपा उमेदवार डॉ. भारती पवार १ लाख ९८ हजार ७७३ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या आहेत. दिंडोरी मतदार संघात त्यांनी राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना पराभूत करून मिळवलेला विजय अनेकांसाठी धक्का मानला जात आहे.

डॉ. भारती पवार

नाशिक - दिंडोरी लोकसभा भाजपा उमेदवार डॉ. भारती पवार १ लाख ९८ हजार ७७३ मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या आहेत. दिंडोरी मतदार संघात त्यांनी राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना पराभूत करून मिळवलेला विजय अनेकांसाठी धक्का मानला जात आहे. या विजयामुळे छगन भुजबळसह जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांची समीकरणे बदलणार असून येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान उभे असनार आहे.

विजयोत्सव साजरा करताना भारती पवार

डॉ. भारती पवार यांना ५ लाख ६७ हजार ४७० एकूण मते मिळाली आहेत. दिंडोरी मतदारसंघातील नांदगाव आणि येवला हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भुजबळ कुटुंबाच्या ताब्यात असून नांदगाव येथे छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज तर येवला येथे खुद्द छगन भुजबळ हे आमदार असूनही या दोन्ही मतदारसंघातून डॉ. भारती पवार यांना मोठ्या प्रमाणात मत मिळाली. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पवार यांनी मारलेली मुसंडी भुजबळांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या तीन निवडणुकीत भाजपची सत्ता असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदार संघात यंदा भाजपने विद्यमान खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले होते. यंदा मात्र पवार भाजपाच्या तिकीटावर विजयी झाल्या आहेत. गेल्या वेळी ज्या पक्षाकडून त्या पराभूत झाल्या होत्या त्याच पक्षाच्या तिकिटावर यंदा त्यांचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

Intro:दिंडोरी लोकसभा भाजपा उमेदवार डॉ .भारती पवार ह्या 198773 मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्याय..त्यानी दिंडोरी मतदार संघातचे राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना पराभूत करून मिळवलेला विजय अनेकांसाठी धक्का मानला जात आहे या विजयामुळे छगन भुजबळसह जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांची समीकरणे बदलणार असून येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान उभे असनार आहे

Body:डॉ. भारती पवार यांना 567470 एकूण मते मिळाली असुन दिंडोरी मतदारसंघातील नांदगाव येवला हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भुजबळ कुटुंबाच्या ताब्यात असून नांदगाव येथे छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज तर येवला येथे खुद्द छगन भुजबळ हे आमदार असूनही या दोन्ही मतदारसंघातून डॉ. भारती पवार यांना मोठ्या प्रमाणात मत मिळाल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना पवार यांनी मारलेली मुसंडी भुजबळ साठी मोठा धक्का मानला जात आहे.

Conclusion:गेल्या तीन निवडणुकीत भाजपची सत्ता असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदार संघात यंदा भाजपने विद्यमान खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले होते यंदा मात्र पवार भाजपाच्या तिकीटावर विजयी झाल्या आहेत म्हणजे गेल्या वेळी ज्या पक्षाकडून त्या पराभूत झाल्या होत्या त्याच पक्षाच्या तिकिटावर यंदा त्यांचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाले आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.