नाशिक : राज्य धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरून वातावरण तापले आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडये यांनी शहरातील मशिदीच्या 100 मीटर अंतराच्या परिसरात अजानच्या वेळेत हनुमान चालीसा, भजन,आरती म्हणण्यास मनाई केली आहे. आता मनसे पाठोपाठ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विश्व हिंदू परिषदेकडून निषेध नोंदवण्यात आलाय. तसेच भाजपने पोलीस आयुक्तांची भेट घेत अनधिकृत व अतिक्रमण असलेल्या मशिदींवरील भोंग्यांना परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे.
धार्मिक स्थळांच्या जागेचे कागदपत्रे तपासावे- नाशिक शहरातील अनेक धार्मिक स्थळे अनधिकृत जागेवर किंवा अतिक्रमित जागेवर असल्याची शक्यता भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांवर भोंग्याची परवानगी देताना त्या धार्मिक स्थळाची वैधता विचारात घ्यावी. जागेची कागदपत्रे, बांधकामाचा मंजूर नकाशा, महानगरपालिकेचा पूर्णत्वाचा दाखला तत्सम इतर कागदपत्रे तपासूनच नियमाप्रमाणे परवानगी द्यावी. अशा मागणीचे पत्र भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी योगेश बहाळकर यांनी आयुक्त पांडे यांना दिले आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण - शहरातील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना परवानगी घेणे सक्तीचे आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाप्रमाणे मर्यादा घालून दिलेल्याआवाजातच ध्वनिक्षेपक लावण्याचे पोलीस आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. या आदेशाबरोबरच आता आयुक्तांनी 3 मे नंतर भोंग्यांवरील ध्वनीची मर्यादा मोजण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला ध्वनी मोजणी यंत्राची दुरुस्ती करण्याची व पुरेसे यंत्र देण्याची सूचना केल्या आहेत. तसेच मंडळ कर्मचाऱ्यांनी पोलिसांना आवाज तीव्रता मोजण्याचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना आयुक्त पांडये यांनी दिल्याचे समजतं. त्यामुळे आता पोलिसांना शहरातील सर्व धार्मिक स्थळांच्या भोंग्या जवळ उभे राहून आवाजाचे मोजमाप करावे लागेल.
नाशिक- अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना परवानगी देऊ नका, भाजपाची मागणी - Bhonga politics in Maharashtra
नाशिकमध्ये आता मनसे पाठोपाठ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. विश्व हिंदू परिषदेकडून निषेध भोंग्यांचा नोंदवण्यात आलाय. तसेच भाजपने पोलीस आयुक्तांची भेट घेत अनधिकृत व अतिक्रमण असलेल्या मशिदींवरील भोंग्यांना परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे.