ETV Bharat / state

इगतपुरीत भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; दोन महिन्यांत १०७ नागरिकांचा घेतला चावा - सौंदर्यनगरी news

सौंदर्यनगरी म्हणून ओळख असलेले इगतपुरी शहर आता एका वेगळ्याच कारणावरून दहशतीखाली आला आहे. कारण येथे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या २ महिन्यांत कुत्र्यांनी तब्बल १०७ जणांचा चावा घेतला आहे. यावर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.

भटकी कुत्रे
author img

By

Published : Sep 22, 2019, 10:21 PM IST

Updated : Sep 22, 2019, 11:43 PM IST

नाशिक - सौंदर्यनगरी म्हणून ओळख असलेले इगतपुरी शहर आता एका वेगळ्याच कारणावरून दहशतीखाली आला आहे. येथील नागरिक, शाळेत जाणारी मुले अगदी जीव मुठीत धरून वावरत आहेत. कारण इगतपुरी शहरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे.

इगतपुरीत भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ

शहरातील विविध ठिकाणी भटकी कुत्री अगदी मोकाटपणे वावरत आहेत. कोणी या कुत्र्यांना इथून हकलण्याचा प्रयत्न जर केला तर हे कुत्रे अंगावर धावून जातात आणि लचके तोडतात. त्यामुळे शहरातील सर्वच नागरिक दहशतीखाली आहेत. मात्र, यावर प्रशासन ठोस कारवाई करत नाही. अनेकवेळा शाळकरी मुलांना ही कुत्री चावा घेतात, त्यांच्या मागे लागतात. यामुळे शाळकरी मुलांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा - सिन्नर येथील एटीएम फोडणाऱ्या ५ संशयितांना ११ तासांत अटक

इगतपुरी शहर हे नाशिक-मुंबई महामार्गच्या लगत आहे. शहराच्या जवळच कसारा घाट आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांची रेलचेल असते. याच वाहनांतून शहरातून काही भटकी कुत्री आणून या ठिकाणी सोडली जातात आणि तीच कुत्री नंतर वस्तीकडे धाव घेतात. त्यामुळे शहरात कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील दोन महिन्यात तब्बल 107 नागरिकांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे नागरिकही धास्तावले आहेत.

हेही वाचा - नाशकात दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने पळविळे तब्बल तीन लाखाचे दागिने

त्यामुळे आता प्रशासनाने ही कुत्र्यांची वाढती संख्या बघता लवकरच खबरदारीच पाऊल उचलावीत आणि बंदोबस्त करावा, अशी मागणी इगतपुरीवासीय करत आहेत. तसेच बाहेरून आणून जे कुत्रे शहरात सोडतात त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी नागरीक करत आहेत.

Intro:सौंदर्यनगरी म्हणून ओळख असलेलं...इगतपुरी शहर आता एका वेगळ्याच कारणावरून दहशतीखाली आलय..येथील नागरिक,शाळेत जाणारी मूल अगदी जीव मुठीत धरून वावरताय..नेमकं कारण काय आहे कशामुळे इगतपुरी शहर भीतीच्या सावटाखाली आलय..Body:ईगतपुरी शहरातील रस्त्याच्या कडेला अगदी बिनधास्तपणे तळ ठोकून बसलेली ही भटकी कुत्री....या भटक्या कुत्र्यांच्या बसलेल्या झुंडी बघून तुम्ही आश्चर्य चकित झाला असाल ना...पण या कुत्र्यांना अजिबात भीती वाटत नाही..कोणी या कुत्र्यांना इथून हकलण्याचा प्रयत्न जर केला तर हे कुत्रे डायरेक अंगावर धावून जातात आणि लचके तोडतात त्यामुळे शहरातील सर्वच नागरिक दहशतीखाली आहेत

बाईट : 1)स्थानिक नागरिकConclusion:या भटक्या कुत्र्यांचा वावर हा संपूर्ण शहरात वाढलाय...गल्लोगल्ली अशीच भटकी कुत्री बघायला मिळतात..नागरिकांनी फेकलेल्या अन्नपदार्थांवर आपली भूक भागउन ही कुत्री इकडे तिकडे फिरतात..मात्र या भटक्या कुत्र्यांनवर प्रशासन देखील काही कारवाई करताना दिसत नाहीये..शहरात वावरणारी लहान मूल..शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना ही कुत्री लक्ष करतात आणि चावा घेतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासही भीती वाटत आहे

बाईट : 2)कोमल खेमकर (विद्यार्थिनी)

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल..की ही कुत्र्यांची संख्या वाढली कशी..त्याच ही अजबच कारण..आहे इगतपुरी शहर हे नाशिक मुंबई महामार्गच्या लगत आहे..शहराच्या जवळच कसारा घाट आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांची रेलचेल असते..याच वाहनांतून काही शहरातून भटकी कुत्री आणून या ठिकाणी सोडली जातात आणि तीच कुत्री नंतर वस्तीकडे धाव घेतात त्यामुळे कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे..गेल्या दोन महिन्यात तब्बल 107 नागरिकांना या कुत्र्यांनी चावा घेतलाय त्यामुळे नागरिकही धास्तावलेत

बाईट : 3)डॉ स्वरूपा देवरे

त्यामुळे आता प्रशासनाने ही कुत्र्यांची वाढती संख्या बघता लवकरच खबरदारीच पाऊल उचलावीत आणि बंदोबस्त करावा अन्यथा इगतपुरी शहरात राहणे ही नागरिकांना मुश्किल होईल..आणि विशेष म्हणजे बाहेरून आणून जे कुत्रे सोडतात त्यांच्यावर कारवाई करावी तेव्हाच कुठंतरी आळा बसेल....
Last Updated : Sep 22, 2019, 11:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.