ETV Bharat / state

मालेगावमधील कोरोनाग्रस्तांना उपचारासाठी नाशिकला आणू नका, भाजप आमदारांची मागणी - corona news in nashik

मालेगाव शहरातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी नाशिक शहरात आणण्यास नाशिकच्या भाजपच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे.

Nashik
मालेगावच्या रुग्णांना उपचारासाठी नाशिकला आणू नका
author img

By

Published : May 7, 2020, 8:46 PM IST

नाशिक - मालेगाव शहरातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी नाशिक शहरात आणण्यास नाशिकच्या भाजपच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. महापौर आणि भाजपच्या आमदारांनी आज जिल्हाधिकार्‍यांची भेट घेत मालेगावचे रुग्ण नाशिकला आणू नये, अशी मागणी केली.

मालेगाव शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मालेगावमध्ये उपचारासाठी रुग्णालय कमी पडू लागली आहेत. त्यामुळे मालेगावमधील अनेक कोरोनाबाधित रुग्णांना नाशिकमधील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केल जात आहे. मात्र, मालेगावमधील या कोरोनाबाधित रुग्णांमुळे नाशिक शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती नाशिकमधील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मालेगावमधील कोरोनाबाधितांना उपचारासाठी नाशिकमध्ये आणू नये, अशी मागणी केली आहे.

मालेगावच्या रुग्णांना उपचारासाठी नाशिकला आणू नका
याशिवाय नाशिक शहराचे महापौर सतीश कुलकर्णी यांनीही आजवर नाशिक शहरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र, मालेगावमधील लोकांची वर्दळ नाशिक शहरात वाढल्यास ही संख्या वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे मालेगाव आणि जिल्ह्याच्या इतर हद्दीवर एसआरपीएफ तैनात करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. गेल्या आठ दिवसात मालेगावमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे नाशिकमधील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी मालेगावमधील रुग्णांना उपचारासाठी नाशिकमध्ये आणण्यास विरोध केला आहे. आज या सर्व लोकप्रतिनिधींनी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेत ही मागणी केली आहे. यावेळी भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. नाशिकमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी सर्व नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र, बाहेरील रुग्ण नाशिकला आल्यास त्याचा संसर्ग वाढल्यास याचा त्रास सर्व नाशिकला होणार आहे. नाशिकमधील अनेक लोकवस्त्या या दाट स्वरुपाच्या असून इथं कोरोनाचा लवकर फैलाव होऊ नये, यासाठी आमचा विरोध असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी सांगितले.

दरम्यान, नाशिक शहरात मालेगावसारखा प्रादुर्भाव वाढला तर आतापर्यंत कंट्रोलमध्ये असलेले नाशिकसुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडेल. शिवाय नाशिकमध्ये यदा कदाचित भविष्यात गरज पडल्यास त्यांची व्यवस्था कुठे करणार? असा सवालही भाजप आमदार राहुल ढिकले यांनी उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.