ETV Bharat / state

Diwali 2023 : यंदाच्या दिवाळीत बच्चे कंपनीमध्ये 'फटाके रॅपर चॉकलेट'ची क्रेज - Firecracker Wrapper

Diwali 2023 : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारपेठा दिवाळीच्या वस्तूंनी नटल्या आहेत. यंदा नव्यानं बाजारात खास बच्चे कंपनीसाठी फटाके रॅपर चॉकलेटची क्रेझ दिसून येत आहे. अनार, फटाक्यांची माळ, छोटे बॉम्ब फटाके, सुरसुरी, रॉकेट चॉकलेटला बच्चे कंपनीची पसंती मिळत आहे.

Diwali 2023
फटाके रॅपर चॉकलेट'ची क्रेज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 12:31 PM IST

Updated : Nov 2, 2023, 1:02 PM IST

फटाके रॅपर चॉकलेट

नाशिक : Diwali 2023 दिवाळी म्हणजे प्रकाश दिव्यांचा, उत्सवाचा सण. दिवाळी साजरा करण्यासाठी सारेच उत्सुक झालेत. भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर अशा या प्रकाश पर्वाचं स्वागत करण्यासाठी सारेच सज्ज झालेयत. दिवाळी म्हणजे सान-थोरांना नव्या कपड्यांप्रमाणेच फटाक्यांचं सुध्दा आकर्षण असतं. त्याचबरोबर नानाविध प्रकारचा फराळ म्हणजे खवैय्यांसाठी एक पर्वणी असते. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या इंदिरानगर येथील रहिवाशी भारती कुटे यांनी लहानग्यांसाठी स्वीट हॅम्पर्स तयार केलेत. भारती कुटे यांनी फटाक्यांच्या विविध रॅपर प्रकारात चॉकलेटस् तयार केले आहे. या हॅप्पी दिवाळी बॉक्समध्ये फटाक्यांचे विवीध प्रकारचे चॉकलेटस् आहेत. त्यात अनार, फटाक्यांची माळ, छोटे बॉम्ब फटाके, सुरसुरी, रॉकेट असून त्यात मधाळ अशी चॉकलेटस् लपलेली आहेत. एकूणच दिवाळीच्या आनंदात आता या होम मेड स्वीट हम्पर्सची भर पडली असून, ग्राहकांना एक नवा चॉईस मिळाला आहे. ही चॉकलेटस् लहानग्यांनाच काय पण मोठ्यांच्याही पसंतीस उतरतील, यात शंकाच नाही.

आरोग्यवर्धक चॉकलेट : चॉकलेट हा सर्व वयोगटातल्या लोकांना आवडणारा पदार्थ. अशात आम्ही तयार केलेली दिवाळी हंपर्स मध्ये फटाक्यांच्या रॅपर मध्ये असलेली ही चॉकलेट तयार केली आहेत. मात्र ही निव्वळ चॉकलेटस् नसून त्यात ड्राय फ्रूटचा समावेश आहे. ही मुलांसाठी आरोग्यवर्धक आहेत, असा दावा भारती कुटे यांनी केलाय.

घरी चॉकलेट बनवण्यासाठी साहित्य

  • कोको पावडर
  • नारळाचे तेल 3/4 कप
  • साखरेची पावडर 1कप
  • दूध पावडर : 1/3 कप
  • व्हॅनिला एसेन्स:एक चमचा
  • ड्राय फ्रुट्स

घरगुती चॉकलेट बनवण्याची कृती : सुरुवातीला चॉकलेट बनवण्याकरिता गॅसवर सपाट बोर्ड असलेली कढई ठेवावी आणि त्यामध्ये थोडे पाणी घालावे. पाणी गरम होण्यासाठी ठेवावे. पाणी गरम झाल्यानंतर त्या कढईमध्ये एक मोठी सपाट दुधाची वाटी ठेवावे व त्यामध्ये नारळाचे तेल घाला. नारळाचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेली साखरची पावडर घालावी. नारळाचे तेल आणि बारीक केलेली पावडर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावी व त्यानंतर त्यामध्ये दूध पावडर ड्राय फ्रुट्स आणि कोको पावडर घालावी. मिक्सर मध्ये मिक्स केल्यानंतर त्यात एक मोठा चमचा व्हॅनिला इसेन्स घालावे. नंतर मिक्सर मध्ये एकत्रित करून घ्यावे. त्यानंतर मिश्रण अगदी सिल्की दिसायला लागते. मिश्रण आवडतीच्या आकारांमध्ये घालून तुमचा आवडतीचा आकार देऊ शकता. त्यानंतर ते भांडे दोन तासांकरता फ्रीजमध्ये ठेवावे. दोन तासानंतर चॉकलेट फ्रीजमधून काढून त्यांना हलक्या हाताने सेपरेट काढून घ्यावे. अशाप्रकारे आपन घरगुती चॉकलेट बनवू शकतो.

हेही वाचा :

  1. Diwali 2023 : आला दिवाळीचा महिना ; जाणून घ्या शुभ काळ आणि पूजा पद्धत
  2. Diwali Bonus २०२३ : सरकारी कर्मचाऱ्यांची दसऱ्याआधीच दिवाळी; चारचाकी घेण्यासाठी मिळणार पंधरा लाख
  3. Diwali bonus News: केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर, 'ही' पात्रता असणाऱ्यांना मिळणार लाभ

Last Updated : Nov 2, 2023, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.