दिंडोरी (नाशिक) - तालुक्यातील एकूण 60 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निम्मा तालुका निवडणुकीसाठी असल्याने निवडणुकीसाठीची तयारी सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार पंकज पवार यांनी दिली.
माघार घेण्याची तारीख 4 जानेवारी -
उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र बुधवार दिनांक 23 डिसेंबर ते बुधवार 30 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत (25, 26 व 27 डिसेंबरची सार्वजनिक सुट्टी वगळून) जनता इंग्लिश स्कुल दिंडोरी याठिकाणी स्वीकारण्यात येतील. तर उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी गुरुवार दिनांक 31 डिसेंबरला सकाळी अकरा वाजेपासून छाननी संपेपर्यंत जनता इंग्लिश स्कुल येथे होईल. उमेदवारांनी नामनिर्देशन मागे घेण्यासाठी सोमवारी 4 जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत जनता इंग्लिश स्कुलमध्ये नामनिर्देशन माघारीची नोटीस संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे द्यावे. त्याच दिवशी दुपारी तीन वाजेनंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येईल.
हेही वाचा - केवळ 17 दिवसांत राज्यात 1 लाख 22 हजार 43 घरांची विक्री, महिनाअखेरीस रेकॉर्ड ब्रेक गृहविक्रीची शक्यता
या ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान -
दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी, कोशिंबे, खडकसुकेने, गोळशी, गोंडेगाव, चिंचखेड, जोपुळ, देवसाने, पालखेड बंधारा, वणी खुर्द, सोनजांब, आंबाड, करंजखेड, बोपेगाव, हस्तेदुमाला, इंदोरे, गांडोळे, चाचडगाव, चौसाळे, परमोरी, पाडे, पांडाणे, वलखेड, वारे, वाघाड, अवनखेड, कुर्णोली, कोकणगाव ब्रु, कोल्हेर, जोरण, पिंप्रीआंचला, पुणेगाव, बादगीचा पाडा, भनवड, माळेदुमाला, लोखंडेवाडी, वनारे, विळवंडी,पिंपळगाव केतकी, आंबे दिंडोरी, नाळेगाव, चंडिकापूर, दहिवी, महाजे, ओझे, मातेरेवाडी, कादवा म्हाळुंगी , फोपळवाडे, लखमापूर, मावडी, करंजाळी, तिसगाव, खेडगावं, जऊळके वणी, म्हेळूस्के,हातनोरे, शिंदवड, तिल्लोळी, तळेगांव वणी, पिंपळगाव धूम या सर्व ग्रामपंचायतींसाठी मतदान शुक्रवार 15 जानेवारीला होणार आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत होईल.