ETV Bharat / state

कोरोनाशी लढा द्यायचाय... मग आवर्जून करा 'या' गोष्टी! - आयुर्वेदिक

आपल्या दिनक्रमामध्ये बदल केल्यास आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते व आपण कोरोना सारख्या रोगाचा सामना करु शकतो, असे आहारतज्ज्ञ डॉ. रणजीता चौबे-शर्मा यांनी सांगितले.

डॉ. रणजीता चौबे शर्मा
डॉ. रणजीता चौबे शर्मा
author img

By

Published : Mar 28, 2020, 9:48 AM IST

Updated : Mar 28, 2020, 11:59 AM IST

नाशिक - कोरोनासह बदलत्या वातावरणमुळे सध्या साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या आपल्याला आपली काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या खाण्या-पिण्यात बदल करून निरोगी राहता येते, असे आहारतज्ज्ञ डॉ. रणजीता चौबे-शर्मा यांनी सांगितले.

डॉ. रणजीता चौबे-शर्मा यांची मुलाखत

सध्या वाढत असलेल्या साथरोगाच्या रुग्णामुळे आपण आहारात बदल करून करून कसे निरोगी राहू शकतो, याबाबत डॉ. चौबे-शर्मा यांनी 'ईटीव्ही भारत'ला खास मुलाखत दिली. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या रोजच्या दिनचर्यामध्ये सकाळी उठल्यावर प्रत्येकाने कोमट पाणी पिले पाहिजे. यानंतर काही वेळाने योगा प्राणायाम किंवा व्यायाम केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. चहा घेत असाल तर हा आयुर्वेदिक चहा असावा. यात आले, पुदिना, लवंग, वेलची, दलिजी, गुळ, असा मसाल्याचा वापर करावा.

नाष्टा व जेवण करताना पोहे, उपला यासारखा हलका असावा. जेवणात पालेभाज्यांचा जास्तीत जास्त वापर व्हावा. फळे घरी आणल्यावर ती आधी काही वेळ मिठाच्या पाण्यात ठेवावीत, नंतरच त्याचे सेवन करावे. शक्यतो बाहेरील फूड पॅकेटमधील पदार्थ खाणे टाळावे. हे सर्व केल्यास आपल्या शरीराला योग्य ती जीवनसत्वे मिळून आपली रोग प्रतिकारशक्ती वाढू शकते व आपण निरोगी राहू शकतो.

हेही वाचा - नाशकात अवकाळी पाऊस; गहू आणि कांद्यासह फळबागांचे नुकसान

Last Updated : Mar 28, 2020, 11:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.