नाशिक - कर्नाटकातील मराठी बांधवांच्या पाठीशी आम्ही आहोत अशी ग्वाही देत मराठी बांधवांवर अत्याचार करू नये, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारकडे केली आहे. बेळगाव, कारवार आणि निपाणीसह कर्नाटकातील महाराष्ट्रव्याप्त भागासह संयुक्त महाराष्ट्र व्हायला हवा, भाजपची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, मराठी बांधवांवरील अत्याचार महाराष्ट्र सहन करणार नाही. अभ्यास न करता नाशिकची मेट्रो रद्द करू नका. त्याआधी समजून घ्या आणि मेट्रो रद्द केली तर नाशिकचेच नुकसान होईल.
हेही वाचा - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला, शिवसेनेने जाळला मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा प्रतिकात्मक पुतळा
मोठ्या आजाराचा खर्च गरिबांना झेपत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना सुरू केली. देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना मोदींनी सुरू केली. यामध्ये शस्त्रक्रिया मोफत होते आणि गरिबांना १००% मोफत इलाज करण्यात येतो. महाराष्ट्र्रात १० लाखांपेक्षा जास्त लोकांना घरे मिळाली आहेत. कोणाला तरी जगवण्याचे काम केले. तर महाराष्ट्रातील ९०% लोकांना मोफत योजनेचा लाभ मिळणार असल्याचेही ते म्हणाले. मोदींनी रुग्ण सेवेचा वसा संपूर्ण देशाला दिला. श्रीमंतांना जो लाभ मिळत आहे तो गरिबाला मिळवून देण्यासाठी मोदींनी प्रयत्न केले.
हेही वाचा - वाईट नेत्याला साथ देणं महाराष्ट्राची चूक, अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टीका
महाविकास आघाडीने केलेल्या कर्जमाफीबद्दल बोलाताना ते म्हणाले, अगोदर सांगायचे की सरसकट कर्जमाफी आणि मात्र नंतर अटी-शर्ती टाकायच्या. टाकलेल्या अटींमुळे कोणाला कर्ज माफी मिळणार? असा टोलाही त्यांनी सरकारला दिला. अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना काहीच नाही. आपले बोलणे वेगळे आणि करणे वेगळे, अशा फसव्या योजना सरकारने आणल्या आहेत. सरकारने तेच केले फक्त नाव बदलले. गरीब शेतकऱ्यांची फसवणूक का करत आहात? असा सवालही फडणवीस यांनी केला.