नाशिक - जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा परिणाम दिसू लागला असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या देखील कमी होत आहे. तसेच कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट आता 95 टक्क्यांवर असून यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये 3500 बेड रिक्त असल्याचे चित्र आहे.
3500 बेड शिल्लक
शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊन तसेच मास्क, सोशल डिस्टनसिंग आणि सॅनियझरचा प्रभावी वापर केल्यामुळे कोरोना दुसरी लाट ओसरू लागली आहे. 24 एप्रिल रोजी 28 हजारांच्या घरात असलेले अक्टिव्ह रुग्ण आता जेमतेम 6 हजार 900च्या घरात येऊन पोहचली आहे. नाशिकचा रिकव्हरी रेट राज्यात सर्वधिक 95.76 टक्क्यांवर पोहचला असून सरकारी आणि खाजगी रुग्णालयात मिळून 7 हजार बेड पैकी 3500 बेड शिल्लक आहे. नाशिकमध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला होता. 24 एप्रिलला शहरात सर्वधिक 28 हजारांवर अक्टिव्ह रुग्ण संख्या पोहचल्याने रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले होते. बेड मिळाले नाही म्हणून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. अशात रेमडिसिव्हर आणि ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने रुग्णांचे प्रचंड हाल झाले होते. मात्र, यानंतर करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमुळे जून महिन्यापासून नवीन बाधित रुग्ण आढळून येण्याच्या संख्येत घट झाली असून 4 एप्रिल रोजी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83 टक्के होते. मात्र आता कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण देखील 95 टक्क्यांवर पोहचले आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याचे समाधानकारक चित्र नाशिकमध्ये बघायला मिळत आहे..
मृत्यू दर मात्र कायम
नाशिक शहरात कोरोनाबधितांचा आकडा कमी होत असून, नवीन आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 2 हजारवरुन आता 700पर्यंत खाली आली आहे. तसेच अक्टिव्ह रुग्ण संख्या 28 हजारहून 6 हजारांवर आली असतांना, मात्र मृत्यूदर कायम आहे. शहारत रोज कोरोनामुळे 10 ते 15 रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे मृत्यूसंख्या कमी होणे गरजेच आहे.
शहरातील रुग्णालयामधील बेडची स्थिती
हॉस्पिटल। एकूण बेड। रिक्त बेड
डॉ झाकीर हुसेन हॉस्पिटल - 160 - 160
बिटको हॉस्पिटल - 700 - 298
ठक्कर कोविड सेंटर - 325 - 225
समाजकल्याण - 500 - 406
राजे संभाजी स्टेडियम - 200 - 170
मेरी कोविड सेंटर - 200 - 139
शहरातील कोरोनाची परिस्थिती
एकूण तपासणीसाठी घेतलेले नमुने- 9 लाख 21 हजार 609
एकूण पॉझिटिव्ह ( मनपा हद्दीतील) 2 लाख 19 हजार 452
एकूण मृत्यू -1हजार 797
सद्यस्थितीत उपचार घेत असलेले रुग्ण- 6 हजार 984
रुग्णालयात दाखल रुग्ण 3 हजार 720
होम आयशोलेशनमध्ये 3 हजार 264