ETV Bharat / state

Nashik Crime: चॉपरने वार करून कंपनीच्या सीईओची निर्घृण हत्या; रिक्षा चालकाने दाखवली माणुसकी - Company Manager In a Deadly Attack

नाशिक शहरात कोयता गॅंगची दहशत पसरली आहे.अज्ञात गुंडांनी कंपनीतून घराकडे जाणाऱ्या कंपनीचे मॅनेजर योगेश मोगरे यांच्यावर धारदार कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. तर या खुनामागे वेगळेच कारण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Death Of a Company Manager
सीइओची निर्घृण हत्या
author img

By

Published : Mar 25, 2023, 11:50 AM IST

नाशिक: नाशिक शहर परिसरात गुन्हेगारीने परत डोके वर काढले आहे. एका कंपनीच्या सीईओची दोघांनी कोयता चॉपरने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना फाळके स्मारक येथील एका बंद पडलेल्या हॉटेलच्या जवळ घडली आहे. हत्या करून कार पळवून नेते वाडीवरे येथे सोडून संशयितांनी पळ काढल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तर आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

कार अडवून केली हत्या: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश मोगरे (वय 28 राहणार इंदिरानगर) हे अंबड येथील रोहिणी पावडर कोटिंग कार कंपनीत सीओपदावर कार्यरात होते. ते 23 तारखेला रात्री 10 वाजेच्या सुमारास कंपनीतून घराकडे जात असताना, अंगण हॉटेल येथे दोन संशयितांनी त्यांची कार अडवली. मोगरे खाली उतरताच संशयितांनी कोयता, चॉपरने त्यांच्यावर हल्ला केला. संशयितांनी त्यांना रस्त्याच्या कडेला फेकून त्यांची कार घेऊन फरार झाले. काही वेळानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका रिक्षा चालकाने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोगरे यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतांना यांचा मृत्यू झाला. पोलीस पथकाकडून संशयितांचा शोध सुरू आहे. तर मोगरे यांच्या परिवारात पश्चात पत्नी, मुलगी, आई भाऊ इतके लोक आहेत.

हत्यामागे दुसरे कारण: संशयितांनी योगेश मोगरे यांची चोरी केलेली कार वाडीवरे शिवार महामार्ग लगत सोडून पलायन केले आहे. नाशिकच्या गुन्हे शाखेच्या पथकाला कारमधून कोयता,चॉपर आणि मोगरे यांचा मोबाईल जप्त केला. संशयित मुंबईकडे पळून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. संशयितांनी लुटण्याच्या उद्देशाने खून केल्याचे प्रथमदर्शी दिसून येत होते. मात्र मोगरे यांचा मोबाईल, पाकीट संशयितांनी नेले नसल्याने या खुनामागे वेगळेच कारण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हल्लेखोर जखमी: योगेश मोगरे यांच्यावर हल्ला करत असताना दोन संशयित जखमी झाल्याचा संशय पोलीस पथकाने व्यक्त केला आहे. या संशयितांवर कुठे उपचार सुरू असल्यास तात्काळ संबंधित जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा आवाहन इंदिरानगर पोलिसांनी केले आहे. तर नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने कळस गाठला आहे. काही दिवसापूर्वीच फुलेनगर मधील गोळीबार, त्याबरोबर सातपूर कार्बन नाका येथील गोळीबार आणि आता कोयत्याने हल्ला यामुळे कोयता गॅंगची दहशत शहरात असून पोलिसांना अजूनही याचा छडा लावण्यात यश येत नसल्याने, नाशिककर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

हेही वाचा: Nashik Crime खळबळजनक चिमुकली आपल्याकडे बघत नसल्याने आईकडून पोटच्या मुलीची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.