ETV Bharat / state

Dasara २०२३ : दसऱ्याला झेंडू खाणार भाव; उत्पादन घटल्याने भावात येणार तेजी - Vijayadashami

Dasara २०२३ : नवरात्र महोत्सवात झेंडूच्या फुलांची मागणी नागरिकांकडून वाढू लागली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा अर्थात विजयादशमीच्या (Vijayadashami) निमित्ताने राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. तर यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे झेंडूच्या फुलांचे उत्पादनही घटल्याने यंदा दसऱ्याला झेंडूची फुले चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Marigold Plant
झेंडूच्या शेतीला येणार तेजी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 8:25 PM IST

दसऱ्याला झेंडू खाणार भाव

नाशिक Dasara २०२३ : मागील वर्षी झालेली अतिवृष्टी व यंदा अत्यल्प पडलेला पाऊस यामुळे कांदा, गहू, मका, हरभरा, सोयाबीन यासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. यातून शेतकरी कसाबसा उभा राहून झेंडूच्या फुलांची शेती (Marigold Flower) केली. मात्र पाऊसच न पडल्याने झाडांची वाढ खुंटली, परिणामी फुलांचे उत्पादन घटले. यामुळे यंदा भाव असला तरी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडणार आहे.

झेंडूच्या फुलांना चांगला भाव : कधी अस्मानी तर कधी सुलतानी अशा एक ना अनेक संकटात सापडलेल्या बळीराजाला मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यंदाही अत्यल्प पडलेला पाऊस यामुळे कांदा, मका, हरभरा, सोयाबीन यासारख्या पिकांमधून मोठया प्रमाणात नुकसान झाले. यामुळे हतबल झालेल्या कसमादे पट्टयातील शेतकऱ्यांना झेंडूच्या फुलांकडुन अपेक्षा होती. यामुळे काही प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी झेंडूचे पीक घेतले. मात्र पाणीच नसल्यानं झेंडूच्या झाडांची वाढ खुंटली व अवघ्या दीड फुटांची वाढ झाल्याने उत्पादन देखील घटले. यामुळे यंदा दसरा दिवाळीला झेंडूच्या फुलांना चांगला भाव असूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडणार आहे.

दसऱ्याला झेंडूची फुले करणार शंभरी पार : सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली. लागवडीनंतर साधारणत: ५० ते ५५ दिवसांनी फुले काढण्यास सुरूवात होते. विजयादशमीचा सण डोळ्यांसमोर ठेवून ऑगस्टच्या अखेरीस व सप्टेंबरच्या सुरूवातीला फुलांची लागवड करण्यात आली. जून-जुलैमध्ये लागवड झालेल्या फुलांना गणेशोत्सवात ३५ ते ४० रुपये घाऊक भाव मिळाला. किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलोने फुले विकली गेली. टोमॅटोचे दर एकदम घसरल्याने शेतकऱ्यांनी पीक काढून टाकत त्या ठिकाणी झेंडूची लागवड करण्यास सुरूवात केली आहे. पिवळ्या व केशरी झेंडूची लागवड वाढली. केशरीपेक्षा पिवळ्या झेंडूची किंमत दहा टक्क्यांनी अधिक असते. सध्या लागवड होत असलेली फुले दिवाळीत बाजारात येऊ शकतील. जिल्ह्यात दरवर्षी साधारणत: ३५० ते ४०० एकरवर झेंडूची लागवड होते. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा लागवड २०० ते २५० एकरवर आली आहे. विजयादशमीला झेंडूला घाऊक बाजारात ६० ते ७० रुपये भाव मिळेल, अशी उत्पादकांना अपेक्षा आहे. किरकोळ बाजारात दसऱ्याला झेंडूची फुले शंभरी गाठू शकतील. मात्र मालच नसल्याने बळीराजाच्या पदरी निराशाच असणार आहे.

पाऊस पडला तर दिवाळी गोड होईल...! : “दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा लागवड कमी झाली. विहिरींना जेमतेम पाणी आहे. घाऊकला ५० रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला तरच फुलशेती परवडेल. दसऱ्याला बाजारात फुले मुबलक येऊ शकतील. नवरात्र व दसऱ्याच्या सुमारास पाऊस झाल्यास तो फुलशेतीला फायदेशीर ठरून उत्पन्न वाढू शकेल."पाऊस झाला तर शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील व यंदा थोड्या प्रमाणात का होईना शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल.अन्यथा शासनाने काही मदत करावी.

झेंडूच्या फुलाला धार्मिक महत्व....! : झेंडूचे धार्मिक महत्त्व इतर फुलांपेक्षा अधिक आहे. विजयादशमीच्या सणाला झेंडूच्या फुलांची सजावट आणि पूजेसाठी हे फुल वापरण्याचं महत्त्व आहे. या फुलाला हिरण्यगर्भ पुष्पही म्हणतात. हिरण्य म्हणजे सोनं आणि त्याच्या रंगासारखे फुल म्हणजे झेंडू. देवपूजा, शस्त्रपूजा, आयुधपूजा तसेच वापरातील यंत्र, वाहन व प्रवेशद्वारावर झेंडूचा वापर प्रामुख्याने होतो.”

हेही वाचा -

  1. झेंडूच्या फुलांना सोन्याचा भाव, आवक घटल्याने दर वाढले
  2. नाशिक : येवल्यातील युवा शेतकऱ्याने सव्वा एकरात लावले 5 हजार झेंडूची रोपे
  3. Farmer Success Story : टोमॅटोसह झेंडू विकुन शेतकरी तीन महिन्यांत झाला कोट्याधीश, वाचा प्रेरणादीय स्टोरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.