नाशिक - दहीहंडी उत्सवावरून मनसे आक्रमक झाली असून हिंदू आणि मराठी सणांवरच कोरोनामुळे बंदी का, असा सवाल करत आम्ही दहीहंडी साजरा करणारच, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. त्यानुसार आज नाशिक मनसेच्यावतीने नाशिकच्या राजगड कार्यालयाबाहेर दहीहंडी उत्सव साजरा करत शासनाचा निषेध नोंदवला.
'तुमच्या आंदोलनाच्यावेळी कोरोना नसतो का?'
कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला असला तरी, संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमिवर सण, उत्सव तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच गर्दी न करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वीच नाशिक दौर्यावर आलेले मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दहीहंडी उत्सवावरून शासनावर टीका केली. भाजपाच्या जनआशिर्वाद यात्रा आणि आंदोलनावेळी कोरोना नसतो का, असा सवाल करत आम्ही दहीहंडी साजरी करणारच, असा इशाराही देशपांडे यांनी दिला. तसेच तिसरी लाट येणार याचा तुमच्याकडे पुरावा काय, हिंदू आणि मराठी सणांनाच बंदी का, असाही प्रश्नही देशपांडे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - ठाण्यात फेरीवाल्याचा सहाय्यक आयुक्तावर हल्ला, बोटे छाटली