ETV Bharat / state

फेसबूकवरचे प्रेम शिक्षिकेला पडले महागात, 55 लाखांचा गंडा - nashik news

शिक्षिकेची 2018 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून नायजेरियन युवकाशी ओळख झाली. युवकाने परदेशात राहत असून मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला असल्याचे सांगितले. नंतर फेसबुक व्हॉटसअ‌ॅपवर दोघांनमध्ये संवाद होत राहिला. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

नाशकात नायजेरियन ट्रॅप
नाशकात नायजेरियन ट्रॅप
author img

By

Published : Feb 10, 2020, 8:40 PM IST

नाशिक- प्रेम आंधळे असते असे म्हटले जाते. अशाच प्रकारे प्रेमातून नाशिकच्या शिक्षिकेला तब्बल 55 लाखांना गंडा घातला गेला आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असलेल्या महिलेची ओळख, फेसबुकच्या माध्यमातून एका परदेशी युवकाशी झाली. या मैत्रीत दोन वर्षांपासून या नायजेरियन युवकाने शिक्षिकेला विविध प्रलोभने देत तिच्याकडून तब्बल 55 लाख रुपयांची रक्कम उकळली. मित्राला मदत करण्यासाठी या शिक्षिकेने चक्क आपले घर विकून या युवकाला पैसे पाठवलेत. हे सगळे एका चित्रपटातील कथानका सारखं वाटत असले तरी या बाबत नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नाशकात नायजेरियन ट्रॅप

हेही वाचा- विदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांचे आणखी एक शिष्टमंडळ करणार काश्मीर दौरा..

पीडित शिक्षिकेची 2018 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून नायजेरियन युवकाशी ओळख झाली. युवकाने परदेशात राहत असून मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला असल्याचे सांगितले. नंतर फेसबुक व्हॉटसअ‌ॅपवर दोघांमध्ये संवाद होत राहिला. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. याचा फायदा घेत तरुणाने एक गिफ्ट पाठवण्यासाठी शिक्षिकेला बँकेत पैसे भरण्यास सांगितले. सुरुवातीला दीड लाख व नंतर वेगवेगळी कारणे देत तब्बल 55 लाख रुपये त्याने शिक्षिकेकडून भरून घेतले.

तरुणाने मी दिल्ली येथे असल्याचे सांगत भारतीय चलन हवे असल्याचे शिक्षिकेला सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवत शिक्षिकेने चक्क स्वताचे एटीएम कार्ड, डेबिट कार्ड कुरिअर मार्फत दिल्लीला पाठवून दिले. तरुणाने कार्डद्वारे विविध ठिकाणी लाखो रुपयांची खरेदी केली. तुला परदेशात घेऊन जातो, असे त्याने शिक्षिकेला सांगितले. यासाठी शिक्षिकेने राहते घर विकले. यातून आलेले पैसेही तिने तरुणाला दिले.

नायजेरियन ट्रॅप म्हणजे काय?
एका सर्व्हेनुसार नायजेरियन देशातील 38 टक्के नागरिक विविध सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करता. सुरुवातीला सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून नंतर भारतातील एखाद्या व्यक्तीला मध्यस्ती करुन त्याच्या खात्यावर पैसे मागविलेला जातात. समोरच्या व्यक्तीची आर्थिक फसवणूक करतात. यात तुम्हाला एक करोडचे बक्षीस लागले आहे. तुम्हाला महागड्या गाडीचे गिफ्ट लागले आहे, असे सांगून तुमचे गिफ्ट दिल्ली एअर पोर्टवर आले असून ते कस्टम विभागाने थांबवले आहे. त्यासाठी तुम्हाला भारतीय चलनात रक्कम भरावी लागेल, असे सांगून एखादा खाते नंबर दिला जातो. त्यावर पैसे भरण्यास सांगितले जातात. विश्वास संपादन करून सुरुवातील हजारो रुपये पाठवण्यास सांगितले जातात. नंतर एखादी व्यक्ती जाळ्यात अडकल्यावर लाखो रुपयांची मागणी केली जाते. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच अशा प्रकारचे मॅसेज फोन आल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Intro:नायजेरियन ट्रॅप : सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षिकेला तब्बल 55 लाखांचा गंडा..

Body:प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं,मात्र हेच मैत्री प्रेम नाशिकच्या शिक्षिकेला तब्बल 55 लाखांना पडलं आहे..जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असलेल्या महिलेची ओळख, फेसबुकच्या माध्यमातून एका परदेशी युवकाशी झाली,ह्या मैत्रीत दोन वर्षापासून या नायजेरियन युवकाने शिक्षिकेला विविध प्रलोभने देत तिच्या कडून तब्बल 55 लाख रुपयांची रक्कम उकळी,मित्राला मदत करण्यासाठी या शिक्षिकेने चक्क आपलं घर विकून या युवकाला पैसे पाठवलेत..हे सगळं एका चित्रपटातील कथानका सारख वाटतं असलं तरी ह्या बाबत नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे...

पीडित शिक्षिक महिलेनं सायबर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की..2018 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून तिची
नायजेरियन युवकाशी ओळख झाली,संशयित युवकाने सुरुवातीला परदेशात राहत असून मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला असल्याचं सांगितलं,नंतर फेसबुक वरून व्हॉटसअप वर दोघांन मध्ये संवाद होतं राहिला,मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले..आणि ही महिला प्रेमात पुरती बुडल्याचे बघून संशयिताने एक गिफ्ट पाठवण्यासाठी भारतीय चलनात खरेदी करावी लागेल,असे सांगतं तिला बँकेत पैसे भरण्यास सांगितले, सुरुवातीला दीड लाख व नंतर वेगवेगळी करणं देत तब्बल 55 लाख रुपये खात्यावर ऑनलाइन पाठवल्याचे महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे...

संशयितांने मी दिल्ली येथे असल्याचे सांगत भारतीय चलन हवे असल्याचे सांगितले...त्याच्यावर विश्वास ठेवत ह्या महिलेने चक्क स्वताचे एटीएम कार्ड, डेबिट कार्ड कुरिअर मार्फत दिल्लीला पाठवून दिले,संशयताने या कार्डद्वारे विविध ठिकाणी लाखो रुपयांची खरेदी करत फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे...एवढ्यावरचं हा विषय थांबला नाही, संशयिताने तुला परदेशात घेऊन जातो असं सांगत,तिला राहते घर विकण्यास भाग पडल, व विकून आलेले सर्व पैसे देखील या संशयित व्यक्तीने उकळ्याचं तक्रारीत म्हटले आहे...

नायजेरियन ट्रॅप म्हणजे काय..
एका सर्व्हे नुसार नायजेरियन देशातील 38 टक्के नागरिक विविध सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करता..सुरवातीला सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून नंतर भारतातील एखादया व्यक्तिला मध्यस्ती करून त्याच्या काऊंट वर पैसे मागविलेला जातात,समोरच्या व्यक्तीची आर्थिक फसवणूक करतात,
एखादे उदाहरण द्यायचे तर.. तुम्हाला एक करोड चे बक्षिस लागले आहे..तुम्हाला महागड्या गाडीचे गिफ्ट लागलं आहे असे सांगून तुमचं गिफ्ट दिल्ली एअर पोर्ट वर आले असून ते कस्टम विभागने थांबले असून, त्यासाठी तुम्हाला भारतीय चलनात रक्कम भरावी लागेल असं सांगून एखादा अकाउंट नंबर दिला जातो आणि त्यावर पैसे भरण्यास सांगितले जाते..विश्वास संपादक करून सुरुवातील हजारो रुपये पाठवण्यास सांगितले जाते नंतर एखादी व्यक्ती जाळ्यात अडकल्यावर लाखो रुपयांची मागणी केली जाते..त्यामुळे नागरीकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये..तसेच अशा प्रकारचे मॅसेज फोन आल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे..

बाईट पौर्णिमा चौघुले पोलीस उप आयुक्त नाशिक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.