ETV Bharat / state

नाशिकमध्ये गुंडांचा उच्छाद...नागरिकांचा खाकीवरील उडाला 'विश्वास' - nashik crime

विश्वास नांगरे पाटील यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गुन्हेगारीला आळा बसेल, अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र ती फोल ठरली.

प्रतिकात्मक फोटो
author img

By

Published : Jun 15, 2019, 6:01 PM IST

Updated : Jun 15, 2019, 8:24 PM IST

नाशिक - शहरात गेल्या महिन्याभरापासून गुंडांनी उच्छाद मांडला आहे. धार्मिक, आध्यत्मिक आणि संस्कृतिक वारसा असलेले नाशिक गुन्हेगारांचा अड्डा बनले आहे. त्यामुळे नाशिककरांचा खाकी वर्दीवरील विश्वास उडाला आहे. मागील काही दिवसांत चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, हत्या ह्यामुळे नाशिक हादरले आहे.

शुक्रवारी दिवसाढवळ्या शहरातील सीटी सेंटर मॉल जवळील मुथ्थुट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडेखोरांनी बेछूट गोळीबार केला. ह्या घटनेत एक कर्मचारी ठार झाला असून ३ जण जखमी झाले. ह्या घटनेने नाशिक मध्ये कायदा सुव्यवस्था उरली नाही, अशी भावना नाशिककरांच्या मनात निर्माण झाली आहे.

या घटनेला काही तास उलटत नाही तोच म्हसरूळ भागात समाजकंटकांनी दहशत निर्माण करण्यासाठी परिसरातील चार ते पाच वाहनांची तोडफोड केली. आठ दिवसांपूर्वी भांडण सोडविण्यास गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला गुंडांनी काठ्यांनी बेदम मारहाण करत जखमी केले. ज्या शहरात पोलिसच सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

विश्वास नांगरे पाटील यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गुन्हेगारीला आळा बसेल, अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. नाशिककरांनी आयुक्तांचे जोरदार स्वागतही केले होते. मात्र, काही दिवसांतच शहरातील गुन्हेगारीने डोके वर काढल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्न चिन्ह उपस्थीत करत आहेत. वाढत्या गुन्हेगारीबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे भाजप आमदार सीमा हिरे यांनी सांगितले आहे.

हेल्मेटसक्ती कारवाईसाठी रस्त्यावर शेकडो पोलीस कामाला लावण्यापेक्षा गुन्हेगारी कशी कमी होईल ह्याकडे आयुक्तांनी लक्ष दयावे. तसेच नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी नाशिकला वाऱ्यावर सोडू नये, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

Intro:धार्मिक नागरी नाशिक मध्ये गुंडांचा उच्छाद..नागरिकांचा खाकी वरील "विश्वास"उडाला..

Body:नाशिक शहरात गेल्या महिन्याभरात पासून गुंडांनी उच्छाद मांडलाआहे..त्यामुळे नाशिककरांचा खाकी वरील विश्वास उडालाय असंच म्हणता येईल, मागील काही दिवसांत चोऱ्या,घरफोड्या,दरोडे,हत्या ह्यामुळे नाशिक हादरलं आहे...

धार्मिक, आध्यत्मिक आणि संस्कृतीचा वारसा असलेल्या नाशिक हे गुन्हेगारांचं माहेर घरं बनू पाहत आहे.मागील महिन्या भारत चोऱ्या,हत्या,घरफोड्या दरोडे आणि गोळीबारामुळे नाशिककरांन मध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.दिवसाढवळ्या शहरातील सीटी सेंटर मॉल जवळील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडेखोरांनी बेछूट गोळीबार केला,ह्या घटनेत एक कर्मचारी ठार झाला असून तीन जण जखमी झालेत ह्या घटनेनं नाशिक मध्ये कायदा सुव्यवस्था उरकी नाही अशी भावना नाशिककरांच्या मनात निर्माण झाली, ह्या घटनेला काही तास उलटत नाही तेच म्हसरूळ भागात समाजकंटकांनी दहशत निर्माण करण्यासाठी परिसरातील चार ते वाहनाची तोडफोड करत पोलिसांना आव्हान दिलेयं,आठ दिवसांन पूर्वी भांडण सोडवण्यास गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला गुंडांनी काठ्यांनी बेदम मारहाण करत जखमी केलं, जिथे पोलिसंच सुरक्षित राहू शकत नाही तिथं सर्वसामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न नाशिककर विचार आहे...
विश्वास नांगरे पाटील यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्या नंतर नाशिकच्या गुन्हेगारीला आळा बसेल अशी भावना नागरिकांन मध्ये असल्याने नांगरे पाटील यांचा नाशिककरांनी जोरदार स्वागत केलं,मात्र काही दिवसांतच शहरातील गुन्हेगारीने डोकं वर काढल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर नागरिक प्रश्न चिन्ह उपस्थीत करतायेत. वाढत्या गुन्हेगारी बाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे भाजप आमदार सीमा हिरे ह्यांनी सांगितलं आहे...

हेल्मेट सक्ती कारवाई साठी रस्त्यावर शेकडो पोलीस उतरवण्या पेक्षा गुन्हेगारी कशी कमी होईल ह्या कडे आयुक्तनी लक्ष दयावे,तसेच दत्तक नाशिक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी नाशिक ला वाऱ्यावर सोडू नये अशा प्रतिक्रिया नागरीकांनी व्यक्त केल्या आहेत ..
टीप बाईट नागरिक 2
स्टँडअप कपिल भास्कर प्रतिनिधी..

Conclusion:
Last Updated : Jun 15, 2019, 8:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.