ETV Bharat / state

'कोरोनाकाळात कोमॉर्बिड रुग्णांनी अधिक दक्षता घेण्याची गरज'

author img

By

Published : Dec 4, 2020, 2:06 PM IST

बाधित आणि मृत्यूमध्ये सर्वाधिक रुग्ण हे विविध आजारांनी ग्रस्त असलेले कोमार्बिड प्रकारातील आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णांनी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी सांगितले.

नाशिक
नाशिक

नाशिक - जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये या आठवड्यात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याचे चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत बाधित आणि मृत्यूमध्ये सर्वाधिक रुग्ण हे विविध आजारांनी ग्रस्त असलेले कोमार्बिड प्रकारातील आहेत. त्यामुळे अशा रुग्णांनी अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी सांगितले.

जिल्ह्यात दिवाळीच्या काळात अवघ्या 110 रुग्णसंख्येपर्यंत पोहोचलेला आकडा नोव्हेंबर अखेरपासून डिसेंबरच्या प्रारंभीच्या आठवड्यात सातत्याने 300 ते 400पर्यंत पोहोचत आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिड रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागणी सांगितले आहे.

का वाढतेय रुग्णसंख्या?

दिवाळीपर्यंत बाधितांचा आकडा खूप खाली आला होता. नागरिकदेखील शासन नियमांचे पालन करत असल्याचे चित्र होते. मात्र दिवाळीच्या काळात बाजारात झालेली गर्दी आणि नागरिकांना सामाजिक अंतराचा विसर पडल्याच्या परिणामामुळे पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायचा असल्यास नागरिकांनी मास्क, वारंवार हाथ धुणे आणि सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे.

नाशिक जिल्ह्यातील 'या' भागात वाढतोय प्रादुर्भाव

नाशिक शहरासह निफाड आणि सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर काही आदिवासी तालुक्यांची वाटचाल शून्याकडे सुरू आहे. त्यामुळे एकीकडे वाढीचे चित्र दिसत असले तरी काही तालुक्यांमध्ये समाधानकारक परिणाम दिसून येत आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक १६६, चांदवड ८१, सिन्नर २७६,दिंडोरी ८१, निफाड ३००, देवळा ४४, नांदगांव ११८, येवला ०९, त्र्यंबकेश्वर ३६, सुरगाणा ०५, पेठ ००, कळवण २६, बागलाण १२५, इगतपुरी ११, मालेगाव ग्रामीण ३३ असे एकूण १ हजार ३१० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६२८, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १३८ तर जिल्ह्याबाहेरील २४ अशा एकूण ३ हजार १०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख २ हजार १२४ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमधे ९३.२६, टक्के, नाशिक शहरात ९६.२२ टक्के, मालेगावमध्ये ९२.९१ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.२५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.१९ इतके आहे.

मृत्यू

ग्रामीण भागातून ६८४, महानगरपालिका क्षेत्रातून ९१५, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून १७१ व जिल्हा बाहेरील ४३ अशा एकूण १ हजार ८१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.