ETV Bharat / state

Nashik Murder : आईला अश्लील मॅसेज पाठवणाऱ्या चुलत भावाची हत्या - Nashik murder

आईला अश्लील मॅसेज पाठवणाऱ्या चुलत भावाची हत्या ( Cousin killed for sending obscene messages to mother ) करण्यात आल्याची घटना नाशिकमधील देवळाली कॅम्पमध्ये ( Nashik murder ) घडली आहे. चुलती पुतण्या यांच्या नात्याला काळिमा फासणारे कारण या खुनातून ( Nashik murder case ) बाहेर आले आहे.

Nashik Murder
Nashik Murder
author img

By

Published : Nov 10, 2022, 7:40 PM IST

नाशिक - दिवाळी सणानंतर बहिणीला सासरी सोडण्यासाठी आलेल्या भावाला जबर मारहाण करून त्याचा खून करण्यात ( Cousin killed for sending obscene messages to mother ) आल्याची घटना देवळाली कॅम्प येथे घडली. चुलती पुतण्या यांच्या नात्याला काळिमा फासणारे कारण या खुनातून ( Nashik murder case ) बाहेर आले आहे.

उपचारादरम्यान मृत्यू - पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रज्ञा सिद्धार्थ कांबळे (वय 30, रा. भगूर, देवळाली कॅम्प) व गणेश पंजाब पठाडे (वय 25, रा. हिंगोली) हे दोघे भाऊ-बहीण आहेत.गणेश हा फिर्यादी बहीण प्रज्ञा कांबळे हिला सासरी सोडण्यासाठी आला होता.8 नोव्हेंबरला साडेदहाच्या सुमारास मोबाईल रिचार्ज करुन येतो असे सांगत तो फोनवर बोलता बोलता घराबाहेर गेला.परंतु बराच वेळ होऊनही आपला भाऊ घरी आला नाही म्हणून त्यांनी शोधाशोध केली. दरम्यान, सायंकाळी देवळाली कॅम्प परिसरात नागझीरा नाला येथे तो जखमी अवस्थेत आढळून आल्याने गणेशला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

बेदम मारहाण करत खून - गणेशचा चुलता भाऊ संशयित आरोपी अमोल अंबादास पठाडे (वय 28, रा. विहितगाव, नाशिक) याने मित्रांच्या मदतीने त्याला बेदम मारहाण करत त्याचा खून केल्याचे बहिणीने म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित अमोल पठाडे याच्यासह चार जणांना ताब्यात घेतले असून, यात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.गणेशला अमोलने विविध ठिकाणी नेत मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. गणेशच्या पश्चात आई,वडील,भाऊ,दोन बहिणी असा परिवार आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात प्रज्ञा कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अमोल पठाडे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईला अश्लिल मेसेज - गणेशच्या खूनाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांनी सांगितले की,मयत गणेश हा अमोलच्या आईला अश्लिल मेसेज करायचा,फोन करायचा.त्याच्या या त्रासाला अमोलची आई कंटाळली होती.अमोलला जेव्हा हे समजले तेव्हा त्याने गणेशचा काटा काढायचा असे ठरवले होते. गणेश नाशिकमध्ये आला असल्याचे समजताच अमोलने ही संधी सोडायची नाही आणि त्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.