ETV Bharat / state

Nashik Saptashringi: नाशिकच्या सप्तशृंगी गडावर बोकड बळीच्या प्रथेला न्यायालयाचा हिरवा कंदील - सप्तशृंगी गडावर बोकड बळी न्यायालयाचा हिरवा कंदील

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर (Sapthasringi goddess) पाच वर्षांपूर्वी बोकड बळीच्या परंपरेवर तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांनी बंदी घातली होती. याप्रकरणात दाखल याचिकेवर न्यायालयाने निकाल दिला आहे. बोकड बळीच्या प्रथेला ( practice of buck sacrifice ) न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे.

Nashik Saptashringi
नाशिकच्या सप्तशृंगी गडावर बोकड बळीच्या प्रथेला न्यायालयाचा हिरवा कंदील
author img

By

Published : Sep 29, 2022, 5:42 PM IST

नाशिक: महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या गडावर (Sapthasringi goddess) पाच वर्षांपूर्वी बोकड बळीच्या परंपरेवर तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांनी बंदी घातली होती. बंदीच्या विरोधात सुरगाणा येथील आदिवासी विकास संस्थेने (Tribal Development Institute) 2019 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज त्यावर सुनावणी होऊन आदिवासी विकास संस्थेच्या बाजूने निकाल देण्यात आला आहे. न्यायालयाने बंदी उठवल्याने यंदाच्या वर्षी दसऱ्याला सप्तशृंगी गडावर बोकड बळी ( practice of buck sacrifice ) दिला जाणार आहे .

काय आहे प्रकरण- सप्तशृंगी गडावर दसऱ्याच्या दिवशी श्री भगवतीच्या मंदीर पायऱ्यांवरील दुसऱ्या टप्प्यावर प्रथेनुसार बोकड बळी देण्याची परंपरा आहे. अशात 11 सप्टेंबर 2016 ला दसऱ्याच्या दिवशी बोकड बळी देण्याचा विधी सुरू असतांना सुरक्षा रक्षकाकडून अनावधानाने रायफलमधून गोळी सुटली होती. त्यानंतर ती गोळी भिंतीवर जाऊन आदळली होती. मात्र, त्यातील छऱ्यांमुळे 12 भाविक किरकोळ जखमी झाले होते, त्यामुळे या परंपरेवर तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांनी ही बंदी घातली होती.

अशी आहे परंपरा सप्तशृंगी गडावर दसऱ्याला बोकडं बळी देण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आहे. आदिवासी बांधवांच्या सानिध्यात श्री सप्तशृंगी मातेचे स्थान असल्याने ते हा विधी करत असतात. या विधीला शेकडो भाविक उपस्थित असतात. यामध्ये भाविकांची श्रद्धा असल्याने बोकड बळी दिला नाहीतर गडावर आपत्ती कोसळते असा भाविकांचा समज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.