ETV Bharat / state

नाशिक शहरातील बाराशे जुने वाडे, धोकादायक इमारतींना मनपाची नोटिस - Section 265 of the Maharashtra Municipal Corporation Act

नाशिक महानगर पालिकेने यंदा एप्रिल महिन्यातच सावध पवित्रा घेत शहरातील 30 वर्षापेक्षा जुन्या मिळकती, वाडे इमारतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. धोकादायक मिळकती लवकरात लवकर मोकळ्या कराव्यात नाही तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 268 नुसार पोलिसांमार्फत इमारती मोकळ्या करून घेण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.

धोकादायक इमारती
धोकादायक इमारती
author img

By

Published : Apr 26, 2022, 7:25 AM IST

नाशिक - नाशिक शहरात मागील पाच वर्षांपासून पावसाळ्यात जुने वाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने पुरातन वाडे व अतिधोकादायक बांधकाम स्वतःहून काढून घेण्याबाबत मालक, भाडेकरूंना नोटिसा जारी केले आहेत. तसेच शहरातील तीस वर्षाहून अधिक जुन्या इमारती वाडे यांचे संबंधितांनी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सक्ती केली जाणार आहे.

30 वर्ष जून्या इमारतींना नोटीसी - मागील 10 वर्षापासून नाशिकचा झपाट्याने विकास होत असून लोकांना राहण्यासाठी गगनचुंबी इमारती बांधून घरे उपलब्ध करून दिली जात आहे. सध्या शहरात जुन्या व नवीन मिळून साडेचार लाख मिळकती आहेत. एकीकडे शहराचा विकास होत असतांना प्रमुख बाजारपेठ आणि नाशिकची मुख्य भाग असलेल्या पंचवटी, जुने नाशिक, यालाच मुख्य बाजारपेठ मानले जाते. आजही येथील जुन्या घरांमध्ये तसेच इमारती आणि वाड्यांमध्ये नागरिक राहतात. मालक व भाडेकरूमध्ये असलेल्या मालकीच्या वादावरून लोक जीव मुठीत धरत राहताना दिसत आहे.

अन्यथा कारवाई - अनेकदा पावसामुळे जुने वाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेता नाशिक महानगर पालिकेने यंदा एप्रिल महिन्यातच सावध पवित्रा घेत शहरातील 30 वर्षापेक्षा जुन्या मिळकती, वाडे इमारतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. धोकादायक मिळकती लवकरात लवकर मोकळ्या कराव्यात नाही तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 268 नुसार पोलिसांमार्फत इमारती मोकळ्या करून घेण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.

स्ट्रक्चर ऑडिट बंधनकारक - नाशिक महानगरपालिकेने शहरातील 30 वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारती वाड्यांनां स्ट्रक्चर ऑडिट करणे बंधनकारक केले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 265 नुसार महानगरपालिका हद्दीतील सर्व निवासी व अनिवासी इमारतीचे घर मालक किंवा भाडेकर यांच्या मालकीच्या मिळकतीचे सर्वेक्षण करून इमारतीचा स्ट्रक्चर सुस्थितीत आहे की नाही याचा अहवाल महानगरपालिका सादर करणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या इमारतीचे सर्वेक्षण करून संबंधित इमारत मालकांना नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्त रमेश पवार यांनी नगररचना विभागाला दिले आहे. तसेच धोकादायक मिळकती मोकळ्या अन्यथा कलम 268 नुसार इमारती मोकळ्या केल्या जातील असा इशाराही देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.