नाशिक - जिल्ह्यातील येवला शहरात आतापर्यंत एकूण 6 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये 4 बालकांचाही समावेश आहे. हे रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्या संपर्कातील 30 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने परिसरात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येवला शहरात वैद्यकीय पथकामार्फत घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. हे पथक शहरातील नेमून दिलेल्या भागात जाऊन प्रत्येक घरातील राहणाऱ्या माणसांची संख्या, कोणी आजारी आहे का, सर्दी-खोकला आहे का तसेच घरातील सदस्य बाहेरगावी जाऊन आले आहे का? अशी सर्व माहिती घेत आहे.
शहरात 46 पथकांमार्फत गेल्या तीन दिवसापासून ही मोहीम राबविली जात आहे. रुग्ण सापडलेल्या भागापासून सुमारे तीन किलोमीटरचा परिसर प्रशासनाने केला सील केला असून परिसरातील कुटुंबांचे आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करण्याचे काम चालू आहे.