ETV Bharat / state

कोरोनाचा धसका कानिफनाथ यात्रेला, यंदा प्रथमच 'या' परंपरेला छेद - यंदा प्रथमच 'या' परंपरेला छेद

कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिक विशेष खबरदारी घेत आहेत. कोरोनाची भल्याभल्यांना धास्ती लागली असून, याचा फटका आता धार्मिक यात्रेला देखील बसत आहे. मनमाड जवळ असलेल्या दरेगाव येथील कानिफनाथ महाराज यात्रेत दरवर्षी रंगपंचमी साजरी केली जाते. यावेळी मात्र, ही रंगपंचमी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

kanifnath Yatra
कोरोनाचा धसका कानिफनाथ यात्रेला
author img

By

Published : Mar 15, 2020, 8:39 AM IST

नाशिक - देशभरात कोरोनाने थैमान घातले असतानाच, भारतातही कोरोना पाय पसरु लागला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिक विशेष खबरदारी घेत आहेत. कोरोनाची भल्याभल्यांना धास्ती लागली असून, याचा फटका आता धार्मिक यात्रेला देखील बसत आहे. मनमाड जवळ असलेल्या दरेगाव येथील कानिफनाथ महाराज यात्रेत दरवर्षी रंगपंचमी साजरी केली जाते. यावेळी मात्र, ही रंगपंचमी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा धसका कानिफनाथ यात्रेला

तहसीलदारांनी लेखी आदेश काढून यावेळची रंगपंचमी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भक्तांचा मात्र हिरमोड झाला आहे. सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा फटका मनमाड जवळ असलेल्या दरेगाव येथील कानिफनाथ महाराज यात्रेच्या उत्सवाला देखील बसला आहे. यात्रेत येणारे हजारो भाविक येथे आल्यानंतर ग्रामस्थांसोबत रंगपंचमी साजरी करण्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. मात्र, कोरोनामुळे प्रथमच ही प्रथा रद्द करणयात आली आहे. रंगपंचमी रद्द करण्यात आली असली तरी यात्रा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कानिफनाथ महाराजांचे दर्शन करण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक आले होते. यावेळी बैलगाडीवर रथ यात्राही काढण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.