ETV Bharat / state

नाशिकच्या 'कॅट्स'चा दीक्षांत सोहळा दिमाखात, नाशिककरांनी अनुभवला हवाई प्रात्यक्षिकांचा थरार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 8:22 PM IST

Updated : Nov 30, 2023, 3:08 PM IST

Nashik Aviation Wing : नाशिकच्या कॉम्बॅक्ट एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांच्या 40 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. हा सोहळा चित्ता, चेतक, ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांची पारणं फेडणारा ठरला.

Convocation Ceremony
नाशिकच्या 'कॅट्स'चा दीक्षांत सोहळा दिमाखात
नाशिकच्या 'कॅट्स'चा दीक्षांत सोहळा दिमाखात पार पडला

नाशिक Nashik Aviation Wing : नाशिकच्या गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला. निमित्त होतं, कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या कॅट्स, लढाऊ वैमानिकांच्या 40 व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याचं. कॅट्सच्या हवाई तळावर लष्करी थाटात दीक्षांत संचलन झालं. यावेळी 33 वैमानिकांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. प्रशिक्षण कालावधित त्यांच्याकडून संपूर्ण तयारी करुन घेतली जाते.

चित्तथरारक कसरती सादर : जमिनीवरील सैन्याला रसद पुरवणे, शत्रुंवर हवाई हल्ला करणे, जखमीना सैनिकांना सुरक्षित ठिकाणी उपचार्थ हलवणे यासह विविध बाबींचं सखोल प्रशिक्षण आणि ज्ञान या ठिकाणी दिलं जातं. युद्धाच्या वेळी महत्वाची साथ देणार्‍या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची तुकडी देशाच्या संरक्षणासाठी सज्ज झाली आहे. सुरूवातीला लष्करी थाटात मान्यवरांच्या हस्ते 33 वैमानिकांना एव्हिएशन विंग आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. यानंतर हवाई दलाच्या चेतक, चित्ता, ध्रुव या हेलिकॉप्टर चमूनं चित्तथरारक कसरती सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी आपल्या पाल्याचे कौतुक पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.

यांचा करण्यात आला सन्मान : यावेळी ट्रॉफी विजेत्यांमध्ये कॅप्टन हसजा शर्मा यांना सिल्वर चितळ ट्रॉफीने सन्मानित करण्यात आलं. तसंच मेजर आकाश मल्होत्रा यांना मेजर प्रदीप अग्रवाल ट्रॉफीनं सन्मानित करण्यात आलं. मेजर दिवाकर शर्मा यांना बेस्ट इन ग्राउंड सब्जेक्ट ट्रॉफीनं सन्मानित करण्यात आलं. या बॅचमध्ये दोन महिला वैमानिकांनीसुद्धा प्रशिक्षण घेतलं, तसंच एका नायजेरियन सैनिकांनी सुद्धा हे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे.

मनाचा ठाव घेणाऱ्या कसरती : दीक्षांत संचलनानंतर प्रांगणात हवाई दलाच्या चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टर चमूने चित्तथरारक कसरती सादर करत उपस्थितांना खिळवून ठेवलं. हवेत करण्यात आलेल्या कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अतिशय चित्तथरारक कसरती सादर करत हवाई दलातील चमूनं उपस्थितांची मनं जिंकली. हेलिकॉप्टरमधून युद्धभूमीवर दाखल होत शत्रूच्या छावण्यांवर हल्ला चढविणे, जखमी सैनिकांना एअर लिफ्ट करणे, एकाचवेळी चार चार हेलिकॉप्टरवर हल्ला करून जाणे, अशी हृदयाचा ठोका चुकविणारी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

हेही वाचा -

  1. Israel Hamas War : इस्रायलमधील युद्धाचा अनुभव सांगताना आव्रहम यांना कोसळलं रडू; 'ईटीव्ही भारत'सोबत Exclusive संवाद
  2. 26/11 दहशतवादी हल्ला : कसाबला कसं जिवंत पकडलं ? निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा थरार
  3. MRF Supercross Competition: नाशिककरांनी अनुभवला वेगवान बाईकचा थरार; एमआरएफ सुपर क्रॉस स्पर्धेत झाली अटीतटीची लढत

Last Updated : Nov 30, 2023, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.