ETV Bharat / state

Nashik Accident : सुसाट कंटेनरने चिरडली दुचाकी व चारचाकी वाहने; 1 ठार, 7 ते 8 जखमी - अपघातात 1 ठार

कोपरगाव मनमाड महामार्गावर कंटेनरने दुचाकी व चार चाकी वाहने चिरडल्याची घटना घडली. यात घटनेत 1 ठार झाला आहे. तर 7 ते 8 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Yeola Accident
सुसाट कंटेनरने चिरडली दुचाकी व चारचाकी वाहने
author img

By

Published : Feb 15, 2023, 9:12 AM IST

सुसाट कंटेनरने चिरडली दुचाकी व चारचाकी वाहने

येवला ( नाशिक ) : कोपरगाव मनमाड महामार्गावर येवला शहरातील विंचूर, चौफुलीजवळ दिनांक 14 फेब्रुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कोपरगाववरून येणाऱ्या एका भरधाव कंटनेरने जवळपास 10 ते 15 मोटरसायकल व 7 ते 8 मोठ्या गाड्यांना कंटेनरने चिरडले. यात 1 जण ठार तर 7 ते 8 जण जखमी झाले आहेत. काही जणांना येवला उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांकडून तपास सुरू : कंटेनरच्या ट्रॉल्यांना मोठ्या धडका बसून शेतमालाचे मोठे नुकसान देखील झाले आहे. कंटेनरचा वेग इतका होता की समोरून येणाऱ्या सर्व गाड्यांना धडक बसत गेली. घटना पहाणाऱ्या लोकांना सुद्धा फिल्मी स्टाईल घटना वाटत होती. या घटनेमध्ये कंटेनर चालक वाहनासह फरार झाला आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास घेत आहेत. सदर घटनेमुळे विंचूर चौफुली ते औरंगाबाद नाका या रोडवर तोबा गर्दी जमा झाली होती. ट्राफिक जॅम झाल्याचे दृश्य पहायला मिळत आहे.

कंटेनर चालक पोलिसांच्या ताब्यात : कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत होता. कोपरगाव-मनमाड महामार्गावरील येवला शहरातील विंचूर-चौफुलीजवळ 10 ते 15 दुचाकी व 7 ते 8 वाहनांना त्याने चिरडले. याच कंटेनर चालकाचा व्हिडिओ हाती लागला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांपैकी एकाने हा व्हिडीओ शूट केला. अक्षरश: ट्रक मागे धावत स्थानिक नागरिकांनी या कंटेनर चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा कंटेनर चालक सर्रासपणे गाड्यांना धडक देत चालला होता. मात्र कंटेनर थांबण्याच्या परिस्थिती नव्हता. बेफान वेगाने मनमाडच्या दिशेने गेला. अनेक युवक तसेच पोलीस त्याचा पाठलाग करत होते. मात्र कोणाच्याही हाती हा कंटेनर लागत नव्हता. मिळेल त्या जागेतून सुसाट कंटेनर चालक कंटेनर घेऊन जात होतो. अखेर हा कंटेनर एका दुचाकीला उडवण्याच्या नादात अंकाईजवळ पलटी झाला. त्यावेळी त्वरित पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले. याबाबत पोलीस स्थानकात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात : पुणे-नाशिक महामार्गावर असणाऱ्या खेड तालुक्यातील शिरोली गावाजवळ भीषण अपघात झाला. पुण्याकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने महिलांच्या घोळक्याला उडवले. या अपघातात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. 5 पेक्षा अधिक महिला जखमी झाल्या. खरापुडी फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. या घोळक्यात १७ महिला होत्या. जखमी महिलांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तातडीने मदत पुरवल्याने महिलांना लवकर उपचार मिळाले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. पोलीस व प्रशासकीय यंत्रणाशी तातडीने संपर्क करुन जखमी महिलांना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : Nashik Pregnant Women Death : 21 वर्षानंतर घरात हलणार होता पाळणा; पण....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.