ETV Bharat / state

बांधकाम ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या - मालेगाव

नांदगाव तालुक्यातील ढेकू बुद्रुक या गावात सोयगाव (ता.मालेगाव) येथील एका बांधकाम ठेकेदाराने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपस करत आहेत.

मृत गोविंद सुर्यवंशी
मृत गोविंद सुर्यवंशी
author img

By

Published : Dec 17, 2019, 5:09 AM IST

नाशिक - ढेकू बुद्रुक (ता. नांदगाव) येथे एका बांधकाम ठेकेदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गोविंद श्रावण सुर्यवंशी ( वय 47 वर्षे, रा. राम मंदिर गल्ली, सोयगाव, ता.मालेगाव), असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे नाव असून आत्यहत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ढेकू बुद्रुक येथील राहुल धाटबळे यांच्या शेतात घराचे बांधकाम करण्यासाठी गोविंद श्रावण सुर्यवंशी हे मालेगावहून आले होते. मागील 3 महिन्यांपासून या घराचे बांधकाम सुरू होते. सोमवार (दि. 16 डिसें) सकाळी ६ वाजता प्रातविधीला गेल्यानंतर ते उशिरापर्यंत परत आले नाही. त्यामुळे कामावरील इतर मजुरांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेतल्यानंतर जनावरांच्या गोठ्यात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मजुरांना दिसून आले.

हेही वाचा - नांदगांव येथील एकाच कुटुंबातील सहा जणांना अन्नातून विषबाधा

त्यानंतर मजुरांनी घर मालक व पोलिसांना याबाबत माहिती दिली. ग्रामीण रुग्णालय, नांदगाव येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. गोविंद याने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट असले तरी याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. याबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग चौगुले, पोलीस हवालदार रमेश पवार, एस.आर.गांगुर्डे हे करीत आहे.

हेही वाचा - नाशिक: अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Intro:नांदगांव तालुक्यातील ढेकू बुद्रुक येथे घराचे काम करण्यासाठी आलेल्या बांधकाम ठेकेदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली गोविंद श्रावण सूर्यवंशी असे ठेकेदाराचे नाव होते.त्याने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट असले तरी याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे.Body:गोविंद श्रावण सुर्यवंशी ( वय - ४७ ) रा.राम मंदिर गल्ली, सोयगाव ( ता.मालेगाव ) असे या बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल धाटबळे यांच्या ढेकू बुुद्रुक येथील शेतात घराचे बांधकाम करण्यासाठी गोविंद श्रावण सुर्यवंशी हे मालेगावहून आलेलेे होते.मागील तीन महिन्यापासून या घराचे बांधकाम सुरू होते.आज सकाळी ६ वाजता प्रांतविधीला गेल्यानंतर ते उशिरापर्यंत परत न आल्याने कामावरील इतर मजुरांनी त्यांना पाहण्यास सुरुवात केली असता जनावराच्या गोठ्यात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून आले.त्यानंतर घर मालक व पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.ग्रामीण रुग्णालय, नांदगाव येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.Conclusion:गोविंद याने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट असले तरी याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत याबाबत नांदगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग चौगुले,पोलीस हवालदार रमेश पवार,एस.आर.गांगुर्डे हे करीत आहे.मयत गोविंद सूर्यवंशी यांना चार भाऊ, पत्नी, दोन मुलं, आई असा परिवार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.