ETV Bharat / state

Nana Patole on Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेंबाना धोकेबाज लोक आवडायचे नाही, उध्दव ठाकरेंनी केले ते योग्यच - नाना पटोले

author img

By

Published : Jan 23, 2022, 7:04 PM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना धोकेबाज लोक अजिबात आवडत नव्हते. अशा लोकांना ते जवळही फिरकु देत नसायचे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ( CM Uddhav Thackeray ) भाजपला दूर करत काँग्रेस सोबत आले ते योग्यच केलं, या शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ( Congree State President Nana Patole Criticize BJP ) भाजपला टोला लगावला.

nana patole
नाना पटोले

नाशिक - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) मोठे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे वेगळेपण म्हणजे त्यांना धोकेबाज लोक अजिबात आवडत नव्हते. अशा लोकांना ते जवळही फिरकु देत नसायचे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ( CM Uddhav Thackeray ) भाजपला दूर करत काँग्रेस सोबत आले ते योग्यच केलं, या शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ( Congree State President Nana Patole Criticize BJP ) भाजपला टोला लगावला. इगतपुरी येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरासाठी ( Congress Chintan Shibir Igatpuri ) ते होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

भाजपने केलेल्या चुकांचे पाप हे शेतकऱ्यांच्या उरावर -

भाजपने केलेल्या चुकांचे पाप हे शेतकऱ्यांच्या उरावर पडत आहे. त्यांच्यामुळेच राज्यांमध्ये वीज निर्मिती करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या, असा आरोपही नाना पटोले यांनी केला. तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कॉंग्रेस अनेक महापालिकांमध्ये सत्तेत असेल, असा दावाही त्यांनी केला. तसेच मी बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. बाळासाहेब ही महाराष्ट्राची ओळख होती. त्यांचे विचार तरुणाना मार्गदर्शन करणारे होते. त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्वांनी त्यांना अभिवादन केले, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - Balasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुहृदयसम्राट म्हणून बाळासाहेब मोठेच.. नेत्यांनी केले अभिवादन

भाजपाच हाच आमचा शत्रू -

आगामी निवडणुकांमध्ये आघाडी होणार का? याबाबत बोलताना आमच्या रणनीतीचा एक भाग आहे. सर्व गोष्टी सांगितल्या जात नाहीत. मात्र, निवडणुकीत भाजप आमचा प्रमुख शत्रू असल्याचे त्यांनी सांगितले. वीज निर्मितीमध्ये राज्य अग्रेसर होते. मात्र, जी विजेची टंचाई निर्माण झाली त्याला सर्वस्वी जबाबदार यापूर्वीचे भाजप सरकार आहे. कोणतेही नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप त्यांनी केला. या सर्वांवर बोलण्यापूर्वी भाजपने आपले स्वतःचे आत्मपरिक्षण केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

सरनाईक यांच्यावर टीका करण्यापूर्वी भाजपने किती रुपयांचे कर्ज माफ केले, याचा आकडा घोषित करावा म्हणजे जनतेला खरं काय आणि खोटं काय हे समजेल. शिवसेनेबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांनी केलेली तक्रार म्हणजे का काचेच्या घरात राहणाऱ्यानी दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करण्यासारखे आहे, असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे भाजपने या सर्वांची विषयावरती न बोलता आपल्या केंद्र सरकारच्या काळात किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे, हे आधी पाहावे. आम्हीच सर्व विचार करूनच शिवसेनेसोबत आघाडी केली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.