नाशिक : नाशिक शहरात होळीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच आज रविवारी रंगपंचमी साजरी होत आहे. फुग्यांमध्ये रंगांचे पाणी भरून ते फेकण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून रूढ झाली आहे. यामुळे अनेकांना इजा झाली असून, वाहनधारक ही यामुळे गंभीर जखमी झालेत ते, त्यामुळे नाशिक पोलिसांनी फुगे फेकण्यावर बंदी घातली असून आदेशाचे पालन न केल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
धुलीवंदनचा सण उत्साहात साजरा : उत्तर भारतासह मुंबईमध्ये धुलीवंदनचा सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. दरवर्षी रंगपंचमी नाशिकमध्ये उत्साहात साजरी केले जाते. नाशिक शहरामध्ये सोमवारी पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात आला. यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला पारंपरिक वीरांची मिरवणूक काढण्यात आली. आता रंगपंचमीसाठी ठीक ठिकाणी शॉवर लावण्यात आले असून नाशिक ढोलाच्या तालावर नाशिककर रंगपंचमीचा आनंद घेणार आहे. रंगपंचमीच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांवर देखील पोलीस कडक करावी करत आहेत.
गुन्हे दाखल करणार : नाशिकमध्ये गेल्या काही वर्षांपासून फुग्यांमध्ये रंगाचे पाणी भरून ते फुगे फेकून मारले जाण्याची पद्धत रूढ झाली. मात्र यामुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्यात. फुग्यांमुळे अनेकजण जखमी देखील झाले आहेत. धावत्या वाहन चालकांवर असे फुगे फेकल्याने अपघात होऊन गंभीर स्वरूपाच्या घटनाही मागील काही वर्षात घडल्यात. त्यामुळे रंगांच्या पाण्याचे फुगे फेकणाऱ्यांवर नाशिक पोलीस आयुक्तालयांमार्फत बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहे. लहान मुलांनी ही फुग्यांचा वापर करू नये यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष द्यावे. रहाड शॉवर डान्स या ठिकाणी सीसीटीव्ही आयोजकांनी बसवले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.
नैसर्गिक रंग : या राहाडीत नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले रंग टाकले जातात. ज्यामुळे त्वचा रोग होत नाही. तसेच उन्हाळ्यात ऊन बाधत नाही. अशीही आख्यायिका आहे. त्यामुळे आबालवृद्धांपासून युवकांची इथं रंग खेळण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. रंग विविध प्रकारच्या वनस्पतीपासून-फुलांपासून तयार केला जातो. त्या फुलांना सुमारे दोन तास एका मोठ्या भांड्यात टाकून उकळविले जाते, या रहाडीतील रंग इतका पक्का असतो की एकदा यात उडी मारली की किमान दोन दिवस तरी रंग निघत नाही. आता 17 राहाडींपैकी 3 राहाडी आहेत. अगोदर या रहाडी पेशवे सरदारांच्या अखत्यारीत होत्या मात्र आता त्या कालांतराने तालीम संघांच्या अखत्यारित आहेत.
शॉवर रंगपंचमी : नाशिकमध्ये गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शॉवर रंगपंचमी खेळली जाते. शहरात ठfक ठिकाणी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. बुधवार पेठ, साक्षी गणेश मंदिर, भद्रकाली परिसरातील गाडगे महाराज पुतळा अशा प्रमुख ठिकाणी शॉवर रंगोत्सवानिमित्त तयारी सुरू झाली आहे. लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक पिचकाऱ्या विक्रीसाठी बाजारात देखील दाखल झाल्या असून त्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
हेही वाचा : Japanese Girl Tweeted : दिल्लीत गैरवर्तनाचा अनुभव येऊनही जपानी तरुणी म्हणाले, भारत एक सुंदर...