ETV Bharat / state

Nashik Crime : तलवारीने वार करत दोन गट भिडले, एक युवक गंभीर जखमी - एकमेकांवर हल्ला केल्याचा प्रकार

नाशिकच्या उंटवाडी परिसरात दोन गटांनी हातात तलवारी घेऊन भरदिवसा एकमेकांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रित झाला आहे. या घटनेत एक युवक गंभीर जखमी झाला असून, यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime
एक युवक गंभीर जखमी
author img

By

Published : Jul 17, 2023, 7:00 PM IST

नाशिकमधील हाच तो मारामारीचा प्रसंग

नाशिक : शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, चोऱ्या अशा घटनांमुळे नाशिककर भयभीत झाले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमध्ये हाणामारीचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशीच एक घटना नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उंटवाडी येथे भरदिवसा घडली.

दोन गटांचा एकमेकांवर हल्ला : दोन गटांनी धारदार शस्त्राने एकमेकांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रित झाला आहे. स्कॉर्पिओ व फॉर्च्युनर कारमधून आलेल्या युवकांमध्ये आपापसात तुंबळ हाणामारी झाली. यात काहींकडे तलवारी व कोयत्यासारखी धारदार हत्यारे होती. त्यातील काहींनी हत्यारे उगारत एका युवकावर हल्ला केला. सोबतच्या युवकांनी तलवारीने जखमी झालेल्या युवकास तातडीने रुग्णालयात दाखल केले.

मोबाईलमध्ये घटना चित्रित : या घटनेनंतर अंबड पोलिसांशी संपर्क साधला असता गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले; मात्र हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला. यात तलवार, कोयते तसेच हाणामारीचे गंभीर चित्र दिसून आले. त्यामुळे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला की काय? असा प्रश्न नाशिककरांना पडू लागला आहे. टवाळखोर युवकांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून होते आहे. काही दिवसांपूर्वीच सिडको भागामध्ये वाहनांच्या काचा फोडणे, चोरी, लुटमारीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

हाणामारीच्या वाढत्या घटना : काही दिवसांपूर्वीच नाशिक रोड येथील रेजिमेंटल प्लाझा जवळील एका कॅफेच्या बाहेर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. यात धारदार शस्त्र तसेच दुकानाबाहेरील असलेल्या खुर्च्या एकमेकांना मारण्याचा प्रकार घडला होता. या घटनेला काही दिवस होत नाही तोच पाच दिवसांपूर्वी सिडकोमध्ये एका वडापाव विक्रेत्यावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. त्याच्यावर आजही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोंबिंग ऑपरेशनची गरज : नाशिक पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वी गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन राबवले होते. यात पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण 128 रेकॉर्डवरील गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. यावेळी 64 संशयितांवर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्तालय हद्दीतून हद्दपार करण्यात आलेल्या 51 गुन्हेगारांच्या घरी शोध घेतला गेला. यावेळी घरात आश्रय घेताना 11 संशयित हद्दपार व्यक्ती आढळून आले. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा:

  1. Delhi Crime News : पतीच्या मृत्यूनंतर एकजण करत होता बलात्कार, महिलेने केले असे काही..
  2. Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी धमकी प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएचा विशेष कोर्टात अर्ज
  3. Bihar Crime News : 'आत्महत्या कशी केली जाते?', या व्यक्तीने बनवला स्वत:च्याच मृत्यूचा प्लॅन!, जाणून घ्या काय आहे प्रकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.