नाशिक - येवला शहर आणि परिसरातील वाढत्या मोकाट जनावरांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहराच्या भाजी बाजारात नागरिकांची मोठी गर्दी असते. याच भाजी बाजारात दोन मोकाट जनावरांची एकमेकांमध्ये झुंज झाली. ही झुंज परिसरात उभ्या असलेल्या वाहनांवर गेल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर नागरिक या जनावरांची झुंज पाहून पळू लागले. तरी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तर प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? असा सूर नागरिकांमधून येत आहे.
हेही वाचा - टिकटॉकवरील 'स्कल ब्रेकर चॅलेंज' ठरतेय धोकादायक, सांगलीत विद्यार्थी जखमी