ETV Bharat / state

Nashik Crime : 59 मुलांचे तस्करी प्रकरण; बांग्लादेश कनेक्शनचा संशय, 5 मौलवींना 12 दिवस पोलीस कोठडी - भुसावळ आणि मनमाड रेल्वे

महाराष्ट्रातील भुसावळ आणि मनमाड रेल्वे स्थानकांवर मंगळवारी रात्री पोलिसांनी 59 अल्पवयीन मुलांची सुटका केली. त्यांना बिहारमधून महाराष्ट्रातील सांगली, पुण्यातील मदरशांमध्ये नेले जात होते. तर या मुलांना हिंदी ही बोलता येत नसल्यामुळे हे मुले बिहार मधील आहेत की, बांग्लादेशी आहे. याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Nashik Crime
59 मुलांच्या तस्करी प्रकरण
author img

By

Published : Jun 1, 2023, 8:51 PM IST

नाशिक: दानापूर-पुणे एक्सप्रेस मधून बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील मुलांच्या तस्करीचा डाव रेल्वे पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणी मंगळवारी रात्री प्रथम भुसावळ रेल्वे स्थानकावर 29 मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू होताच त्याच गाडीत अवघ्या दोन तासात मनमाड रेल्वे स्टेशनवरही 30 मुले सापडली, याप्रकरणी मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ येथील एक तर मनमाड येथून चार अशा पाच मौलवींना रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना चांदवड न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. एका एनजीओच्या माध्यमातून मुलांना आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. या मुलांना हिंदी ही बोलता येत नसल्यामुळे हे सर्व एकूण 59 मुले बिहार मधील आहेत की, बांग्लादेश आहे. याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

असा प्रकार उघडकीस आला: दानापूर- पुणे या रेल्वेच्या एस 10 या डब्यातून एक वकील पाठक हे प्रवास करीत होते. त्यांनी या मुलांना डब्यात पाहिले, त्या मुलांसोबत कोणीही नव्हते. त्या मुलांना भूकही लागली होती. वकील पाठक यांनी रेल्वे बोर्डाला ट्वीट करून मुलांचा फोटो व माहिती कळवली. त्याद्वारे रेल्वे बोर्डाकडून तात्काळ भुसावळ आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी शोध मोहीम राबवत मुलांची सुटका केली. तसेच शेवटच्या एका डब्यातून मौलानाला ताब्यात घेण्यात आले.

सर्व मुलांची जन्मतारीख 1 जानेवारीच: पोलीस व आरपीएफ ने ताब्यात घेतलेल्या सर्व मुलांच्या जन्मतारखा या 1 जानेवारी 2005, 1 जानेवारी 2006, 1 जानेवारी 2007, 1 जानेवारी 2008, 1 जानेवारी 2011, 1 जानेवारी 2012 अशा आहेत. त्या संशयास्पद असल्यामुळे पोलिसांकडून त्यांच्या मूळ कागदपत्रांचा ही शोध घेतला जात आहे. त्यामुळे या मुलांची तस्करी तर होत नाही ना असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नाशिकच्या मदरशांशी संबंध नाही: नाशिकच्या मदरशांमधून घरी जाणारे किंवा येणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक असतात. तर रेल्वेतून प्रवास करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांचा नाशिकच्या कुठल्याही मदरशांशी काहीही संबंध नाही, असे नाशिकचे शहर एक हतीब हाफिज हिसामुद्दिन खातीब यांनी सांगितले आहे.

बांगलादेश कनेक्शनचा संशय: बांग्लादेशातून किशनगंज 550 किलोमीटरवर आहे. या प्रवासासाठी 12 तास लागतात. बहुतांश बांग्लादेशी बिहार मार्गे भारतात घुसखोरी करत असल्याचे उघड झाले आहे. रेल्वेत पकडलेली सर्व अल्पवयीन मुले बिहारमधीलच आहेत की, बांग्लादेशातील ? याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. मुलांची कुटुंबीय आल्यानंतर ओळख पटवून मुलांना त्यांच्या ताब्यात देणार असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा -

  1. Child Trafficking बिहारमधून तस्करी केलेल्या मुलांची नाशिकच्या बाल सुधारगृहात रवानगी
  2. Nashik Crime News रेल्वे पोलिसांकडून बिहारमधील 60 मुलांची सुटका मदरशाच्या नावाखाली मुलांच्या तस्करीचा धंदा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.