ETV Bharat / state

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोक्याची शक्यता : छगन भुजबळ

गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या स्थिर होती, परंतू ती पुन्हा नव्याने वाढू नये यासाठी लागू करण्यात आलेले कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस यंत्रणेने कारवाई करावी. पोलिसांच्या सहकार्याशिवाय लागू करण्यात आलेले निर्बंध यशस्वी होणार नसल्याने पोलिसांची भूमिका या काळात अत्यंत महत्त्वाची असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.

छगन भुजबळ
छगन भुजबळ
author img

By

Published : May 8, 2021, 8:00 PM IST

नाशिक - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ऑक्सिजन व रेमडेसिवीर यांचा पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने लहान मुलांच्या उपाचारासाठी स्वंतत्र कक्ष तयार करुन त्याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे, तसेच वाढत्या रुग्ण संख्येच्या नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी लोकांमध्ये कोरोना निर्बंध पाळण्यासाठी समुपदेशन व प्रबोधन करावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात आवश्यक सर्व प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करून त्या कायमस्वरूपी उपलब्ध करण्यावर भर देवून मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी कोरोना आढावा बैठकीत प्रशासकीय अधिकारी यांना दिल्या आहेत.

29 ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केंद्र सुरू होणार

जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी जिल्ह्यात 29 ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केंद्र सुरू करण्यात येत आहेत. ज्यामुळे भविष्यातील ऑक्सिजनची गरज पूर्ण करणे शक्य होणार आहे. तसेच आदिवासी भागातील नागरिक ज्या डॉक्टर व तेथील स्थानिक औषोधोपचार करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवून आजारपणात इलाज करतात, अशा डॉक्टर्स व स्थानिक लोकांची बैठक घेवून त्यांना कोरोनाच्या लढाईत सहभागी करून घेण्यात यावे, जेणेकरून त्यांच्यामार्फत आदिवासी भागातील नागरिकांमध्ये कोरोना आजाराच्या उपचार विषयी जागृती होवून आदिवासी भागातील कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी मदत होईल.

18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी ऑनलाइन नाव नोंदणी करताना काही तांत्रिक अडचणी येत असल्याने राज्य शासनाने लसीकरणाच्या नाव नोंदणीसाठी नवीन प्रणाली विकसित करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. तसेच राज्य शासनाने गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या स्थिर होती, परंतू ती पुन्हा नव्याने वाढू नये यासाठी लागू करण्यात आलेले कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस यंत्रणेने कारवाई करावी. पोलिसांच्या सहकार्याशिवाय लागू करण्यात आलेले निर्बंध यशस्वी होणार नसल्याने पोलिसांची भूमिका या काळात अत्यंत महत्त्वाची असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.