ETV Bharat / state

मांजरपाडा प्रकल्पाचे गुजरातकडे जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार - छगन भुजबळ - मांजरपाडा प्रकल्पा बद्दल बातमी

मांजरपाडा प्रकल्पाचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी वळण योजनेद्वारे गोदावरी खोऱ्यात वळवणार , असे छगन भुजबळ म्हणाले. भविष्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाड्यासह महाराष्ट्राची तहान भागविण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे ही ते म्हणाले.

chhagan-bhujbal-said-that-water-from-manjarpada-project-to-gujarat-will-be-diverted-to-godavari-valley-through-diversion-scheme
मांजरपाडा प्रकल्पाचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी वळण योजनेद्वारे गोदावरी खोऱ्यात वळवणार - छगन भुजबळ
author img

By

Published : Apr 2, 2021, 10:09 PM IST

नाशिक - मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होणार असून यंदाच्या पावसाळ्यात येवला, चांदवडला पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होणार आहे. भविष्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून भविष्यात मराठवाड्यासह महाराष्ट्राची तहान भविण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

मांजरपाडा प्रकल्पाचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी वळण योजनेद्वारे गोदावरी खोऱ्यात वळवणार - छगन भुजबळ

मांजरपाडा प्रकल्पाचे उर्वरित काम मे २०२१ पर्यंत केले पूर्ण जाणार -

दिंडोरी येथील मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाच्या सुरु असलेल्या कामांची पालकमंत्री भुजबळ यांनी शुक्रवारी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह पाहणी केली. या अगोदरच मांजरपाडा प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. दायित्वाला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्य धरणाचे अपूर्ण असलेले काम काम गेल्या महिनाभरापूर्वी सुरु करण्यात आले आहे. सद्य स्थितीत प्रकल्पाचे ८७ टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले असून मे २०२१ अखेरपर्यंत या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे. काम सुरू झाल्यापासून १५ मीटर उंचीच्या धरणाचे बांधकाम झाले असून आता केवळ १४ मीटर धरणाचे बांधकाम शिल्लक राहिले आहे. धरणाचे मातीकाम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मांजरपाडा (देवसाने) मुख्य धरणाच्या सांडव्याची घळभरणी सुरू असून हे काम १५ मे पर्यंत करण्याचे नियोजन असल्याने जलदगतीने काम करण्यात येत आहे.

या भागातील देवसाने ते गोगूळ हा रस्ता काही कालावधीसाठी बंद करण्यात आला आहे. देवसाने हे गाव दिंडोरी तालूक्यात असून ते पक्क्या डांबरी रस्ताने दिंडोरीला जोडलेले आहे. गोगूळ हे सुरगाणा तालूक्यातील डांगराळे भागातील गाव आहे. घळभरणी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही गावे पुन:श्च धरणमाथ्यावरील रस्त्याद्वारे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. या रस्त्यावर एकूण ३३ गर्डर बसविण्यात येणार असून त्यापैकी २६ गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. इतर गर्डर बसवण्याचे काम सुरु आहे. सर्व कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मंत्री भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने येवला व चांडवड तालुक्याला पाणी होनार उपलब्ध -

मांजरपाडा धरणाच्या कामासोबतच कॅनॉल व त्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे कामही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात करण्यात येणार आहे. येवला तालुक्यातील डोंगरगावपर्यंत हे पाणी पोहचणार आहे. सन २०१९ पासून मुख्य वळण बोगद्याद्वारे पार नदीचे पाणी अंशत: वळविण्यास सुरुवात झाली आहे. धरणाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण झाल्यावर पाणी पूर्ण क्षमतेने गोदावरी खोऱ्यात वळविले जाणार असून येत्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने येवला व चांदवड तालुक्याला पाणी उपलब्ध होणार आहे.

वणी कोविड केअर सेंटरची केली पाहणी -

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज अचानकपणे पालकमंत्री छगन भुजबळ व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वणी गावातील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी रूग्णांना वेळेवर औषधे जेवण यासह आवश्यक सुविधा मिळतात की नाही याबाबत रुग्णांची चौकशी केली. यानंतर पालकमंत्र्यांनी वणी येथील कृष्णा हायस्पीड सिटी स्कॅन सेंटरलाही भेट दिली.

मोदी स्टेडियममध्ये होती गर्दी -

गुजरातमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांची कोरोना टेस्ट बंधनकारक आहेत. आपल्याकडे राज्य पातळीवर हा निर्णय कसा होतो हे बघावे लागेल गुजरातमध्ये मागे मोदी स्टेडियममध्ये गर्दी होती, मास्क नव्हते ईतर राज्यातील ठिकाणी मोठ्या मोठ्या सभा होत आहे. आज मुख्यमंत्री बोलणार आहेत, त्यावर आपण विचार करा वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे नविन काही करतात का बघू अस भुजबळ यांनी या वेळी सागितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.