येवला : दहा हजार कोटी रुपये खर्च करून देखील एवढी प्रसिद्धी उर्फी (Urfi Javed) यांना मिळाली नसती, एवढी प्रसिद्धी मीडियामुळे मिळाली आहे. तरी या गोष्टी ठराविक वेळेपर्यंतच मीडियाने दाखवाव्या, जेणेकरून इतर देखील जे प्रश्न नागरिकांचे आहेत ते सोडवता येतील, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. आज ते येवला (Yeola) दौऱ्यावर आले असता, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
उर्फीला मीडियामुळे प्रसिद्धी : सध्या नेतेमंडळी एकेरी भाषेत बोलत आहे. याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले की, कोणी आरे केले की दुसरा कारे करणारच सध्या हेच चालू आहे. त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाला बगल देत उर्फीला मीडियामुळे प्रसिद्धी मिळत असून; दहा हजार कोटी रुपये खर्च करून देखील एवढी प्रसिद्धी मिळाली नसती, तेवढी मीडियामुळे मिळाली आहे. त्यामुळे या गोष्टीला ठराविक मर्यादे पर्यंत दाखवावे, जेणेकरून इतर देखील राज्यात अनेक प्रश्न आहे ते सोडवता येतील, असे भुजबळ म्हणाले.
कोर्टाचा निर्णय लवकर व्हावा : सर्व निवडणुका सध्या लांबलेल्या आहेत. याबाबत भुजबळांना विचारले असता भुजबळ म्हणाले की, कधी म्हणतात दोन वार्डांचा एक प्रभाग करायचा, कधी म्हणता तीन वार्डांचा एक प्रभाग करायचा, त्यामुळे या गोष्टी सध्या लांबत चालल्या असूनही या गोष्टी सर्व कोर्टात केस चालू असल्याने काहीतरी निर्णय लवकर लागावा जेणेकरून निवडणुका घेता येतील.
आता लोकांना समजायला लागले : नगरपालिका तसेच महानगरपालिकेमध्ये एमआयएमची चाचपणी चालू आहे, याबाबत भुजबळांना विचारले असता भुजबळ म्हणाले की, या देशात लोकशाही आहे. कोणीही स्वतंत्र उभे राहू शकता अथवा तुमचा स्वतःचा पक्ष देखील काढून निवडणूक लढवू शकतात कोणालाही अडवता येत नाही. त्यामुळे याच्यापुढे अनेक पक्ष येत राहतील. त्यामुळे कोणीजरी उभे राहिले तर विशिष्ट पक्षाचे मत कमी करण्यासाठी कोण उभे राहत आहे, फायदा कोणाला होणार आहे. या गोष्टी आता लोकांना समजायला लागले आहेत. तरी हे जे पक्ष नवीन येत आहेत ते काही निवडून येत नाही. मात्र दुसऱ्यांना पाडायचे विचार हे पक्ष करत असल्याचा आता लोकांना समजायला लागले आहे, असे भुजबळ म्हणाले.
सध्या उर्फी जावेदचे प्रकरण प्रचंड गाजत आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) सतत तिच्यावर टिका करतांना दिसत आहे. त्यात आता महिला आयोगाने देखील उडी घेतलेली आहे. तर नुकतेच उर्फीने केलेले भगव्या रंगाचे कपडे प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.