ETV Bharat / state

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे वादग्रस्त विधान; हिंदू महासंघ आक्रमक - छगन भुजबळ यांचा भिडेंना टोला

महापुरुषांबद्दल सतत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरोधात राज्यभर तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. तर आता संभाजी भिडे यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. ब्राह्मण समाजातील लोक त्यांच्या मुलांची संभाजी आणि शिवाजी अशी नावे ठेवत नाहीत, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Bhujbal Bhide Dispute
मंत्री छगन भुजबळ
author img

By

Published : Aug 20, 2023, 4:04 PM IST

Updated : Aug 20, 2023, 4:36 PM IST

नाशिक : ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे ठेवत नाहीत, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मविप्रच्या समाज दिन (Samaj Din) कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. आम्ही कुठेही गेलो, तरी शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा अजिबात सोडणार नाही, असेही मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट केले.

संभाजी भिडेंचे खरे नाव मनोहर कुलकर्णी : भुजबळ पुढे म्हणाले की, संभाजी भिडेंचे खरे नाव मनोहर कुलकर्णी आहे. कुठल्याही ब्राह्मण घरामध्ये कोणीही शिवाजी, संभाजी अशी नावे ठेवत नाहीत. हा माणूस उठसूट कोणावरही टीका करतो. इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभे राहावे लागेल. आम्ही सत्तेत का सामील झालो हे मी आधीही सांगितले आहे. महात्मा फुलेंनी सांगितले होते की, सत्तेविना झाल्या सर्व कळा अवकळा. तसेच बाबासाहेबांनी देखील सांगितले होते, शिका आणि सत्तेत सामील व्हा. बाबासाहेब सत्तेत सामील झाले आणि आपल्याला संविधान मिळाले.

संभाजी भिडे यांनी स्पष्ट करावे की त्यांचं नाव संभाजी आहे. संभाजी भिडेंचे खरे नाव मनोहर कुलकर्णी आहे. यात ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजातील लोक त्यांच्या मुलांची संभाजी आणि शिवाजी अशी नावे ठेवत नाहीत - छगन भुजबळ, मंत्री

किती शिवाजी आणि संभाजी नावांचे लोक : हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत म्हटले की, मुळात भुजबळ यांचे हिंदू धर्मातल्या कोणत्याही जातीला बदनाम करण्याचे धोरण का असते? भुजबळ यांनी त्यांच्या घरात किती शिवाजी आणि संभाजी नावांचे लोक आहेत ते सांगावे. तुम्ही तुमच्या मुलांची नावे शिवाजी किंवा संभाजी अशी का ठेवली नाही? अनेक जातींमध्ये शिवाजी आणि संभाजी अशी नावे असलेली वेगवेगळी माणसे आम्ही दाखवू शकतो. तुम्ही स्वतःचे नाव बदला आणि शिवाजी भुजबळ करून दाखवा.

ही सर्व माझी दैवत आहेत : आपल्याला शिक्षण दिले ते महात्मा फुले (Mahatma Fule), सावित्रीबाई फुले, शाहू महाराज (Shahu Maharaj) आणि कायद्यात ज्याचे पूर्ण रूपांतर केले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) आणि त्यानंतर भाऊराव पाटील तसेच नंतर रावसाहेब थोरात यांनीच. पण कोणाला सरस्वती आवडते, पण आम्ही यांना कधी पाहीले नाही. आम्हाला काही त्यांनी शिक्षण दिले नाही. आम्हाला ज्यांनी शिक्षण दिले ते या लोकांनी दिले, म्हणून ते माझे देव आहेत. तेच देव तुमचेही असले पाहिजेत, असे मंत्री भुजबळ यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

Chhagan Bhujbal Reaction : भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal On Politics : राजकारण हा संभ्रमाचा खेळ : छगन भुजबळ

Sambhaji Bhide Case : संभाजी भिडे यांच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ

Last Updated : Aug 20, 2023, 4:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.