ETV Bharat / state

Chhagan Bhujbal On Ajit Pawar Dispute : हो मी अजित पवारांशी मोठ्या आवाजात बोललो; मात्र... छगन भुजबळांनी सांगितलं खरं कारण - मराठवाड्यात ओबीसीच्या नोंदी पैसे घेऊन

Chhagan Bhujbal On Ajit Pawar Dispute : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 5:43 PM IST

छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

नाशिक Chhagan Bhujbal On Ajit Pawar Dispute : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यानंतर राज्यात चर्चेला उधाण आलं होतं. यावर छगन भुजबळ म्हणाले की, मी अजित पवारांशी मोठ्या आवाजात बोललो, मात्र आमच्यात कोणताही वाद झालेला नाही. दोन भावांमध्ये जशी चर्चा होते, तशी ती चर्चा आमच्यात झाली. मात्र, काहींनी पराचा कावळा केला, असं स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिलं. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

त्यामुळं मी उस्फूर्तपणे बोललो : ओबीसी आरक्षणाबाबत भुजबळ म्हणाले की, मी बैठकीत दिलेली आकडेवारी गायकवाड आयोगाची होती. सरकारमध्ये नोकरीत घेताना आरक्षणाचा अनुशेष बाकी आहे. याकडं मी लक्ष वेधलं. न्याय मिळत नसेल तर बोलावं लागतं. नोकरीत अनुशेष दिसतोय, हे मी सांगत असताना अजित पवारांनी सचिवांना याबाबत विचारलं. त्यावर सचिवानं अशी काही माहिती नसल्याचं सांगितलं. त्यामुळं मी उस्फूर्तपणे बोललो. तुमच्याकडे माहिती नाही असं, होऊ शकत नाही. माझा मुद्दा मी थोड्या मोठ्या आवाजात मांडला, मात्र याचा पराचा कावळा करण्यात आला.

मराठवाड्यात ओबीसीच्या नोंदी पैसे घेऊन : काही ठिकाणी चुकीच्या नोंदी करून नगरसेवक निवडून आले आहेत. याबाबत त्यांच्या विरोधात कोर्टात केसेस आहेत. प्रत्येकाच्या विरोधात कोर्टात जाणं शक्य नाही. शासनानं याकडं लक्ष दिलं पाहिजे. चुकीचं प्रमाणपत्र कोणालाही देता कामा नये.

मी कशाला ब्लॅकमेल करणार : भुजबळांनी पवारांना ब्लॅकमेल केल्याचा कदमांनी आरोप केला आहे. यावर मी कशाला ब्लॅकमेल करणार, केलं असेल तर पवारांनी सांगावं. रुग्णालयात जाऊन कागदपत्रं चेक करावी, आपण कुटुंबियांना मदत मागत असेल, तर यात काय चुकीचं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलंय.

जातीनिहाय जनगणना : महात्मा फुले समता परिषदेकडून गेल्या 30 वर्षापासून आम्ही जातिनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी करत आहोत. वेगवेगळ्या राज्यातून ही मागणी आम्ही केली आहे. बिहार राज्याचे जातीनिहाय जनगणणनेचं काम पूर्ण होत आलेलं आहे. ज्या-ज्या राज्यांना वाटते त्यांनी जातीनिहाय जनगणना केलेली आहे. यामुळं ओबीसीचं प्रमाण समजेल असं मंत्री भुजबळ यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. Aaditya Thackeray On CM : मुख्यमंत्री फक्त सुट्टी घालवण्यासाठी विदेश दौऱ्यावर; आदित्य ठाकरेंची टीका
  2. Sanjay Raut on Dasara Melava : शिंदेंच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का? दसरा मेळाव्यावरुन राऊतांचा हल्लाबोल
  3. Shivaji Park Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा? शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने; महापालिकेची भूमिका काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.