नाशिक - राज्यात कोणत्याही गोष्टीला विरोध होत असतो. बोटक्लबला अगोदर विरोध होताच, पण नंतर स्वागत झालं. वाईन ही दारू नाही. वाईन कल्चर वाढवाव म्हणून प्रयत्न आहे. गोव्यात व मध्यप्रदेशमध्ये काय चालू आहे. जे विरोध करतात त्यांच्या साखर कारखान्यात दारू तयार होते, असा टोला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
'काही दिवसांनी फुकट लस मिळणार नाही' -
थकीत वीजबील प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले, ५५ ते ६० हजार कोटी रुपये कर्ज आहे. आपण थोडे तरी पैसे भरायला हवे. निदान चालू बील तरी भरली पाहिजेत, असे मत त्यांनी मांडले आहे. काही दिवसात मेडिकलमध्ये लस उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात पहिला डोस 85 टक्के नागरिकांनी घेतला आहे, तर दुसरा डोस 52 टक्के नागरिकांनी घेतला आहे. सध्या लस मोफत मिळत आहे, तर लसीचा फायदा घ्या, असे सांगत काही दिवसांनी फुकट लस मिळणार नाही, असा इशाराच त्यांनी लस घेण्यास टाळाटाळ करणार्यांना दिला.
‘पर्यटन स्थळं खुली’ -
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील निर्बंध उठवण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री भुजबळ यानी केली. या अगोदर सर्व खुली पर्यटनस्थळ बंद करण्यात आली होती. मात्र, सुरक्षा नियमाचे पालन बंनधनकारक आहे. तसेच सर्व वसतिगृह सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.