ETV Bharat / state

कोरोना: स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिलसोबतच मे आणि जून महिन्याचेही धान्य देणार - भुजबळ

author img

By

Published : Mar 20, 2020, 8:35 AM IST

Updated : Mar 20, 2020, 10:13 AM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांची सोय व्हावी, म्हणून स्वस्त धान्य दुकानात एप्रीलसोबतच मे व जून महिन्यांचे धान्यही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

chhagan bhujbal comment on In advance grain provide
छगन भुजबळ

नाशिक - राज्यात कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर नागरीकांची सोय व्हावी, म्हणून स्वस्त धान्य दुकानात एप्रीलसोबतच मे व जून महिन्यांचे धान्यही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 ची अंमलबजावणी करण्यात येते. अंत्योदय अन्न योजनेखाली राज्यात 24 लाख 7 हजार 462 कुटुंबाना प्रतिमहिना प्रतिशिधापत्रिका 35 किलो धान्य आणि प्राधान्य कुटुंबातील 5 कोटी 48 लाख 60 हजार 331 व्यक्तींना प्रतिमाह 5 किलो याप्रमाणात धान्य येते. यामध्ये रुपये 3 प्रतिकिलो दराने तांदूळ आणि रुपये 2 प्रतिकिलो या दराने गहू उपलब्ध करून देण्यात येतो.

स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिलसोबतच मे आणि जून महिन्याचेही धान्य देणार - छगन भुजबळ

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी हा निर्णय गेतल्याचे भुजबळ म्हणाले. दुकानातून शिधावस्तूचे वितरण करताना लाभार्थ्यांना बायोमेट्रिक पडताळणी न करता रास्तभाव दुकांनदारांनी स्वतःचे आधार प्रमाणित करून धान्यवाटपाची सुविधा ई-पास उपकरणावर उपलब्ध करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थ्यांना ई-पास उपकरणावर बोट अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे छगन भुजबळ म्हणाले. मास्क आणि सॅनिटायझरचा जीवनावश्यक वस्तूत समाविष्ट करण्यात आला असून, ह्याचा काळाबाजार करण्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Last Updated : Mar 20, 2020, 10:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.