नाशिक : जयंत पाटीलांवर केलेली निलंबनाची ( Jayant Patil suspension in the winter session ) कारवाई योग्य असल्याचे प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrasekhar Bawankule reaction on Jayant Patil suspension ) यांनी नाशिकमधील निफाड येथे केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत भारतीय स्टेट बँक, जिल्हा उद्योग केंद्र, युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मालवाहतूक व फ्रूट ट्रक, इतर उद्योगासाठी कर्ज वाटप सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
निलंबनाची कारवाई योग्य : 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत भारतीय स्टेट बँक,जिल्हा उद्योग केंद्र, खादी व ग्राम उद्योग संघ यांच्या सहकार्याने गरजू गोरगरीब युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मालवाहतूक व फ्रूट ट्रक व इतर उद्योगांसाठी कर्ज वाटप सोहळा निफाड येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता जयंत पाटलावर केलेली कारवाई योग्य आहे का याबाबत बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात काही चूक नसतानाही बारा बारा आमदार हे निलंबित करण्यात आले होते. मात्र जयंत पाटील यांनी भर सभागृहामध्ये बोलले असून त्यांचे बोलणे अशोभनीय असून आहे जयंत पाटील यांनी खुलेआम शिवीगाळ केले असून त्यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई योग्य असल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
याकरिता उपमुख्यमंत्री दिल्लीत जातात : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्लीला गेले असून ही गोष्ट गुलदस्त्यात असल्याने याबाबत बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक योजनांचा निधी थकलेला असून तो आणण्याकरता व विविध योजना महाराष्ट्रात आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले. यावेळी देखील आगामी निवडणुकीत भाजप एक नंबर राहील याबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की नक्कीच जिल्हा परिषद, पंचायत समिती असो व स्थानिक स्वराज्य संस्था असो यामध्ये भाजप हा एक नंबर राहील, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.