ETV Bharat / state

क्रेडाईचे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सुविधेचे आदर्श मॉडेल - पालकमंत्री छगन भुजबळ - Chagan Bhujbal news

कोरोनाचीची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची व्यवस्था केली आहे. क्रेडाईने तयार केलेले हे कोविड सेंटर अतिशय उत्कृष्ट बनवले आहे, असे पालकमंत्री भुजबळ यांनी म्हटले.

Nashik covid center
नाशिक कोविड सेंटर
author img

By

Published : Aug 10, 2020, 8:48 AM IST

नाशिक- कोविड रुग्णांची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. क्रेडाईने तयार केलेले हे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सेवेचे एक आदर्श मॉडेल असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. क्रेडाई आणि नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन रविवारी पार पडले.

कोरोनाची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची व्यवस्था केली आहे. क्रेडाईने तयार केलेले हे कोविड सेंटर अतिशय उत्कृष्ट बनवले आहे, असे पालकमंत्री भुजबळ यांनी म्हटले. कोविड केअर सेंटर बनविण्यासाठी चित्रकार तसेच परिश्रम घेतलेल्या सर्वांचे कार्य कौतुकास्पद आहे. रिक्रियेशन कक्षाच्या माध्यमातून विविध खेळ, पुस्तके , टीव्ही यासह मनोरंजनाची तसेच रुग्णांना योगा, मेडिटेशनसाठी व्यवस्था करण्यात आल्याने अतिशय उत्तम स्वरूपाचे कोविड केअर सेंटर निर्माण झाले आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.

हॉस्पिटलमधील बेड्स संपतील तेव्हा या कोविड केअर सेंटरचा वापर करण्यात येईल. बेडची संख्या कमी पडू नये यासाठी अतिरिक्त बेड्ससाठी ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली गेली आहे. रुग्णांची संख्या कमी कशी होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तपासणी अधिक होत असल्याने रुग्णांचा आकडा वाढतो आहे. परंतु, कोरोनाचा प्रसार अधिक वाढू नये यासाठी तपासणी अधिक वाढवून रुग्णांचा शोध घेण्याचे काम सुरूच ठेवावे. कोरोना हे युद्ध असून सर्वांना एकत्र येऊन त्यासाठी लढण्याची आवश्यकता आहे. कोरोना होणारच नाही याची काळजी सर्वांना घ्यावी, घाबरून जाऊ नये, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास अजून नवीन ठिकाणी जागा बघून प्राथमिक सुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात जेणेकरून तेथेही आवश्यकता पडल्यास तातडीने कोविड केअर सेंटर उभारता येणे शक्य होईल. सामाजिक बांधिलकी ठेऊन सर्व संस्था संघटना काम करत आहेत, समाजिक दायित्व म्हणून हे काम सदैव कायम ठेवण्याचे आवाहनही यावेळी भुजबळ यांनी केले आहे.

नाशिकच्या झोपडपट्टी भागात रुग्णांची संख्या कमी झाली असून कंपनीच्या परिसरात तसेच सोसायटी परिसरात रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात १२०० पथके काम करत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार पुणे मुंबईच्या धर्तीवर ठक्कर डोम येथे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी उपचारासोबत रिक्रियेशन सेंटरची निर्मिती करण्यात आली असून रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून दिले जाणार असून याठिकाणी अत्यावश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले.

क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन यांनी कोविडची महामारी जेव्हापासून ओढवली गेली तेव्हापासून आम्ही मदतीचा हात पुढे केला होता असे सांगितले.कोविडच्या संदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात आवश्यक ती मदत करण्यास क्रेडाईने वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी क्रेडाईला कोविड केअर सेंटर उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार सामाजिक भान ठेवून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अत्यंत सोयीसुविधा उपलब्ध असलेले हे सेंटर आहे. यात ३५० बेडची व्यवस्था करण्यात आली असून ५ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.तसेच टीव्ही, चेस, कॅरम, सेल्फी पॉईंट यासह मनोरंजनाच्या अनेक सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या असल्याचे महाजन यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.