ETV Bharat / state

Suicide Case : भाजपचे माजी नगरसेवकासह एका पदाधिकाऱ्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Suicide Note

नाशिकमध्ये एका गुन्ह्यात संशयित असलेल्या आरोपीने घोटी येथील भरवीरमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली. अनिरुद्ध धोंडू शिंदे (Aniruddha Dhondu Shinde) असे आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) आणि कामगार आघाडी पदाधिकारी विक्रम नागरे (Vikram Nagare) यांच्या नावाचा (former BJP corporator and office bearer) उल्लेख त्याने केला आहे. माझ्या आत्महत्यास हे दोघे जबाबदार असल्याचे (Suicide Note) म्हटले आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात मुकेश आणि विक्रम नागरे यांच्या विरोधात आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (case registered) करण्यात आला आहे.

Aniruddha Dhondu Shinde
अनिरुद्ध धोंडू शिंदे
author img

By

Published : Dec 28, 2022, 1:57 PM IST

नाशिकमध्ये एका गुन्ह्यात संशयित असलेल्या आरोपीने घोटी येथील भरवीरमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली

नाशिक : मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा कामगार आघाडी पदाधिकारी विक्रम नागरे यांच्या घरावर हल्ला करून खंडणी मागितल्या प्रकरणी संशयित अनिरुद्ध शिंदे यांच्यावर गुन्हा (case registered) दाखल झाला होता. मात्र घटनेनंतर तो फरार झाला होता. या नंतर शिंदे याने त्याच्या मूळगावी घोटी भरवीर येथे विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.

Suicide Note
सुसाईड नोट

पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन : आत्महत्या करण्यापूर्वी शिंदेने भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाजप पदाधिकारी विक्रम नागरे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा यासाठी शिंदे यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी शहानिशा करून मुकेश शहाणे आणि विक्रम नागरे यांच्या विरोधात रात्री उशीरा आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे सुसाईड नोट मध्ये : मुकेश शहाणे आणि विक्रम नागरे (former BJP corporator and office bearer) यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत (Suicide Note) आहे. या दोघांनी मला खूप त्रास दिला. माझ्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले. तुला जन्मठेप करेल अशी वारंवार धमकी देत होते. तसेच मला माझ्यावर मोका अंतर्गत कारवाई केली. याचा माझ्या कुटुंबाला व मित्रांना खूप त्रास होत आहे, म्हणून मी जीव देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना पोलिसांनी शासन करावे हा माझा शेवटचा क्षण आहे, अशी माहिती शिंदे यांनी सुसाईड नोट मध्ये लिहिली.

याच दरम्यान नाशिकमध्ये ही घटना घडली : नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील एका हॉस्पिटलमधील वार्ड बॉयने किरकोळ वादातून महिला डॉक्टरवर कात्रीने (scissors) हल्ला केल्याची घटना (Ward Boy Attacked On Woman Doctor) घडली आहे. या हल्ल्यात महिलेच्या मानेवर आणि पोटावर गंभीर दुखापत झाली आहे. यामधील संशयित वार्ड बॉयला गंगापूर पोलिसांनी अटक (ward boy was arrested Gangapur police) केली आहे. झालेल्या वादाचा राग मनात धरून वॉर्डबॉय डोंगरे याने 26 तारखेला सोमवार रोजी, रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दवाखान्यातील कात्रीने डॉ. दराडे यांचे मानेवर आणि पोटावर वार करून; त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये डॉ. दराडे याना गंभीर दुखापत झाली आहे. आणि आता त्यांच्यावर रुग्णालयात उपचार (woman doctor is undergoing treatment in hospital) सुरु आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल झाला असून; संशयित वॉर्डबॉय अनिकेत डोंगरे याला अटक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.