ETV Bharat / state

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा राडा, 100 पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल - ॉनाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

नाशिकमध्ये काल शिवसेना-भाजप कार्यकर्ते आपापसात भिडले. त्यामुळे याप्रकरणी 100 हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काहींना पोलिसांनी अटक केली आहे. तर काहींचा शोध सुरू आहे.

Nashik
Nashik
author img

By

Published : Aug 25, 2021, 9:59 AM IST

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल (CM Uddhav Thackeray) खालच्या (Offensive statement) थराचं वक्तव्य केल्याने वाद पेटला. राणेंविरोधात नाशिक पोलिसात गुन्हाही (Nashik Police) दाखल झाला. यानंतर शिवसेना-भाजप कार्यकर्ते आपापसात (bjp-shiv sena workers fighting) भिडले. आता या प्रकरणी 100 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक पोलिसांनी काही सेना-भाजप पदाधिकाऱ्यांना अटक (Arrested) केली आहे. काहींचा शोध सुरू आहे.

पोलीस निरीक्षक साजन सोनवणे

शिवसैनिकांची भाजप कार्यालयावर दगडफेक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद पेटला. नाशिक शहरात (Nashik City) काल (24 ऑगस्ट) दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समाेरासमाेर भिडले. शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर (Nashik Bjp Office) दगडफेक केली. तसेच राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा (Symbolic statue of Rane burnt) जाळला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस (Bhadrakali Police Station Nashik) ठाण्यात परस्परविरोधी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांनी दिली आहे.

शिवसेना कार्यालयावरही दगडफेक

शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Nashik corporator Sudhakar Badgujar) यांच्या फिर्यादीनुसार राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. काल सकाळी साडे नऊच्या सुमारास शिवसेनेचे कार्यकर्ते संशयित दीपक दातीर, बाळा दराडे व इतर ५ ते ६ जणांनी एनडी पटेल रोडवरील भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयावर दगडफेक केली. या दगडफेकीत कार्यकर्त्यांसह कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दुखापत झाली. याप्रकरणी विजय बापूराव कुलकर्णी (५९) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तसेच चारुदत्त रामराव आहेर (रा. सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार शिवसेनेचे महेंद्र भिकाजी बडवे, वैभव अशोक खैरे, दिंगबर तुकाराम मोगरे, हेमंत गोविंदराव उन्हाळे, दस्तगीर अल्लारखा रंगरेज, मुकुंद मधुकर सपकाळ, संजय नारायण चिंचोले, गोकुळ एकनाथ तिडके, मोहित सुरेश गोसावी, सुनील बाबुराव गाेडसे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या 10 संशयितांना ताब्यात घेतले होते. तर शिवसेनेच्या नगरसेविका ॲड. शामला दीक्षित (Shiv Sena corporator Adv. Shyamala Dixit) यांच्या फिर्यादीनुसार भाजपचे मुकेश शहाणे, अनिकेत सोनवणे, अमित घुगे, अमोल इधे, पवन कलाल, किरण गाडे यांच्यासह इतर ७५ ते १०० जणांनी शिवसेना कार्यालयाच्या दिशेने दगडफेक केली. तसेच, गोंधळ घालत धमकावले. याप्रकरणी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यांनुसार दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी कुदळ, फावडे, दगड, सोडा बॉटल, दांडे वापरल्याचे आढळून आले आहे.

नक्की काय म्हणाले राणे?

'देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही', असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. पाहा व्हिडिओ

हेही वाचा - नारायण राणेंचे संकट वाढले, नाशिक पोलिसांची नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.