पावसातली सेल्फी पडली महागात, नाशिकमध्ये २४ जणांवर गुन्हा दाखल - दारणा धरण
शहरातील अनेक पूल पाण्याखाली गेल्यामुळे सर्व वाहतूक होळकर पुलावरून होत आहे. त्यातच 'पूर बघायला' आलेल्या लोकांनी बेशिस्तपणे वाहने उभी केल्यामुळे वाहतूकीस आणखी अडचण निर्माण होत आहे. याबाबत पोलीस विभागाने कलम 144 प्रमाणे प्रतिबंधक आदेश पारित केला असून, त्याचे पालन करून पोलीस विभागाला व नागरी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नाशिक - मुसळधार पाऊस सुरू असताना, रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करून सेल्फी घेणाऱ्या एकूण २४ जणांवर कारवाई करण्यात आली. प्रशासनाने दिलेले आदेश न पाळता, केवळ थरार म्हणून स्वतःचा तसेच दुसऱ्यांचा जीवदेखील धोक्यात घालणाऱ्या लोकांवर ही कारवाई करण्यात आली. पोलीसांनी दिलेले आदेश धुडकावत, बचावकार्यात अडथळा आणल्यामुळे भा. द. वि. कलम १८८ प्रमाणे या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये पंचवटी, गंगापूर आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात प्रत्येकी ६, म्हसरुळ पोलीस ठाण्यात ४ तर सरकारवाडा पोलीस ठाण्यात २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील अनेक पूल पाण्याखाली गेल्यामुळे सर्व वाहतूक होळकर पुलावरून होत आहे. त्यातच 'पूर बघायला' आलेल्या लोकांनी बेशिस्तपणे वाहने उभी केल्यामुळे वाहतूकीस आणखी अडचण निर्माण होत आहे. याबाबत पोलीस विभागाने कलम 144 प्रमाणे प्रतिबंधक आदेश पारित केला असून, त्याचे पालन करून पोलीस विभागाला व नागरी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर (45,486 क्यूसेस), होळकर पूल (62,006 क्यूसेस), दारणा धरण (40,342 क्यूसेस), नांदूरमध्यमेश्वर धरण (29,1525 क्यूसेस), भावली धरण (2,159 क्यूसेस), आळंदी धरण (8,865 क्यूसेस), पालखेड धरण (67,706 क्यूसेस), चनकापूर (17,207 क्यूसेस), हरणबारी (9,157 क्यूसेस) आणि पुणेगाव (5,673 क्यूसेस) अशा प्रमाणात हा विसर्ग सुरू आहे.
[8/5, 6:47 AM] Kapil Bhaskar: प्रतिबंधक आदेशाचा भंग केल्याने 24 जणांवर कारवाई.....
नाशिक शहरातील पूर परिस्थिती हाताळत असताना त्या ठिकानी प्रशासनाला कारवाई दरम्यान अडथळा करनारया, स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घालणारया, बेशिस्त पणे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करनारया, सेल्फीच्या नादात पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करनारया एकुण 24 जणांवर भा. द. वी. कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
कारवाई खालीलप्रमाणे आहे---
पंचवटी पो. स्टे. --6
म्हसरुळ पो. स्टे.--4
भद्रकाली पो. स्टे.--6
सरकारवाडा पो. स्टे.--2
गंगापुर पो. स्टे.----6
एकुण--24
सर्वांना आवाहन आहे की पूर परिस्थिती बाबत पोलिस प्रशासन सतर्क असुन अहोरात्र बंदोबस्त, evacuation, rescue operation व वहातूक नियनम करित आहेत.
अनेक पूल पाण्याखाली गेल्याने होळकर पुलावर वाहतुकीचा ताण येत असुन पूर पाहण्यासाठी येनारया लोकांच्या वाहनाच्या बेशिस्त पार्किंग मुळे अडचणी निर्माण होत आहेत.
तरी याबाबत पोलिस विभागाने क. 144 प्रमाणे प्रतिबंधक आदेश पारित केला असुन त्याचे पालन करावे व पोलिस विभागाला व नागरी प्रशासनाला सहकार्य करावे.
जनसंपर्क अधिकारी,
नाशिक शहर आयुक्तलय.
------------------------------
[8/5, 7:00 AM] Kapil Bhaskar: नाशिक न्यूज फ्लॅश....
5/8/2019@ 6am
नाशिक मध्ये पावसाची संततधार सुरूच..
नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणांमधून खालील प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे .
गंगापूर - 45486 क्यूसेस,
दारणा धरणातून 40342 क्यूसेस
नांदूरमध्यमेश्वर धरणं 291525 क्यूसेस
भावली धरणं 2159 क्यूसेस
आळंदी धरणं 8865 क्यूसेस
पालखेड धरणं 67706 क्यूसेस
चनकापूर - 17207
Haranbari - 9157
पुणेगाव - 5673
होळकर पूल - 62006 cusecs
Conclusion: