दिंडोरी (नाशिक) - तालुक्यातील निळवंडी येथील आश्विनी किरण पताडे या विवाहीतेने दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली होती. या प्रकरणी सासरच्या सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिंडोरी पोलीस ठाण्यात दाखल जाला आहे.
आश्विनीने दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव प्राशन केले होते. तिला अत्यव्यस्त अवस्थेत नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंत तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी जोपर्यंत सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाख होत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा पवित्रा घेतला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आश्विनीच्या पार्थिवावर निळवंडी येथे तिच्या सासरच्या घरासमोरच अंत्यविधी करण्यात आला.
मृत आश्विनीच्या सासरच्या मंडळींनी फ्लॅट घेण्यासाठी 5 लाखांची मागणी केली होती. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा शारीरिक व मानसिळ छळ केला. या जाचास कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आश्विनीचे वडील भाऊसाहेब हळदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आश्विनीचा पती किरण संजय पताडे, सासरा संजय राजाराम पताडे, सासू कल्पना संजय पताडे, दिर रोशन संजय पताडे (सर्व रा. निळवंडी ता.दिंडोरी), नंदई तुषार पोपटराव दयाळ व नंनद मोनिका पोपटराव दयाळ (दोघे रा.नाशिक) यांच्याविरोधात दिंडोरी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये धनगर समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन