नाशिक - आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघा ( फिडो ) तर्फे आयोजित ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत नाशिकचा ग्रँडमास्टर विदित गुजराथीच्या नेतृत्वाखाली भारत आणि रशिया संघाला फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत संयुक्त सुवर्णपदक मिळाले आहे. अंतिम लढतीच्या दुसऱ्या फेरीत इंटरनेट कनेक्शन आणि सव्र्हरमध्ये बिघाड झाला आणि भारताच्या दोन खेळाडूंना पराभूत म्हणून जाहीर करण्यात आले. तेव्हा भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडे याबाबत तक्रार केली. तेव्हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने भारत आणि रशियाच्या संघाला स्पर्धेचे संयुक्त विजेते जाहीर केले. दरम्यान, नाशिकच्या विदितच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला बलाढ्य रशियासह संयुक्त विजेदेपद मिळाल्याने, सर्वत्र विदितचे कौतूक होत आहे.
इंटरनेट कनेक्शन आणि सव्र्हरमधील बिघाडाचा फटका ऑनलाइन फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला बसला. रशियाविरुद्धच्या अंतिम सामन्यातील पहिली फेरी बरोबरीत सुटली. दुसऱ्या फेरीत इंटरनेट कनेक्शनमध्ये बिघाड झाल्याबाबत भारताने दाद मागितली. तेव्हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) भारत आणि रशिया या दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले. दरम्यान, भारताचे हे पहिलेच ऑलिम्पियाडमधील पहिलेच सुवर्णपदक आहे.
अंतिम लढतीत भारत रशियाकडून १.५-४.५ असा पराभूत झाला. अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या पटावर दिव्या देशमुख, निहाल सरीन यांच्या लढतींना इंटरनेट कनेक्शनचा फटका बसला. वेळेच्या बंधनामुळे त्यांना ही लढत गमवावी लागली. दुसरीकडे तिसऱ्या पटावर खेळणाऱ्या कोनेरू हम्पीलाही इंटरनेटचा फटका बसला. त्यावर भारतीय संघाने 'फिडे'कडे दाद मागितली आणि या संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेणाऱ्या समितीने दोन्ही देशांना संयुक्त विजेतेपद घोषित करण्याचा निर्णय घेतला.
भारताचे ऑलिम्पियाड स्पर्धेतील हे पहिला सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारताने गतविजेत्या चीनवर ४-२ अशी मात केली होती. विदिथ गुजरातीने भारतीय संघाचे नेतृत्व केले. महत्वाचे म्हणजे, विश्वनाथन आनंद, पेंटाल्या हरिकृष्ण असे मातब्बर संघात असूनही हा मान विदिथला मिळाला होता. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा ऑनलाइन खेळवण्यात आली. त्यामुळे खुला गट व महिला गट, अशी स्वतंत्र विभागणी करण्यात आलेली नव्हती. त्यातही उल्लेखनीय बाब म्हणजे, युवा बुद्धिबळपटूंचाही प्रत्येक संघात समावेश करण्यात आला होता.
हेही वाचा - IPL २०२० : दुनिया हिला देंगे हम; मुंबई इंडियन्स नव्या अवतारात मैदानात उतरणार
हेही वाचा - 'रैनाच्या डोक्यात यश गेलयं; तो ११ कोटी रुपये सोडून गेला'