नाशिक - पर्यावरण पूरक असलेल्या वैदिक पेंटने नाशिकच्या इमारती सजत आहेत. शेण, गोमूत्र, कडुलिंबाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या पेंटने स्वच्छ हवा, कीटक मुक्त घर राहण्यास मदत होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या रंगाची मागणी वाढते. थंड हवेचे ठिकाण म्हणून नाशिकची ओळख आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंगमुळे नाशिकच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी नाशिकचा तरुण उद्योजक मंदार शास्त्री याने पुढाकार घेत नाशिक जिल्ह्यात वैदिक रंग रुजवण्यास सुरवात केली आहे. माहागड्या आणि केमिकल रंगाला पर्याय म्हणून पर्यवरण पूरक वैदिक रंगाला मागणी वाढली आहे. शहरातील अनमोल नयनतारा आणि धणू सोलुशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पाचशेहून अधिक सदनिका सह पर्यावरण पूरक ग्रीन बिल्डिंग राहता हे वातावरण बदल पर्यावरणाचे संवर्धन तसेच पर्यावरण स्नेही जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन बिल्डिंगचा धोरणास शासनाचा पर्यावरण पूरक घटकांना प्राधान्य देत आहे, याच भूमिकेतून वैदिक पेंटच्या प्रयोग सोसायटीसाठी होतो आहे.
ऑक्सिजनचे प्रमाण वाढते - शेण गोमूत्र यासह कडुलिंबाचा रस या पेंटमध्ये वापर करण्यात आला आहे. त्यामुळे घरातील हवा अत्यंत शुद्ध राहते. हा रंग व्हिओसी बजेटमध्ये मोडत असल्याने घरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढत असल्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध झाले आहे. त्याशिवाय यासाठी दहा रुपये किलो शेण आणि 20 रुपये लिटर दराने गोमूत्र खरेदी करावे लागत असल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत आहे. तसेच हा रंग केमिकल रंगापेक्षा पंचवीस ते तीस टक्के स्वस्त असल्याचं वैदिक पेंटचे मंदार शास्त्री यांनी सांगितले.
वैदिक रंगाचे फायदे - वैदिक रंगात शेण, गोमूत्र, कडुलिंबाचा वापर केला जात असल्याने घरातील तापमान उन्हाळ्यात थंड राहते. भिंतीवर कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही. रसायनमुक्त रंगामुळे निरामय आरोग्याची हमी मिळते. रंगकाम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही.
रंग देताना त्रास जाणवत नाही - मी 15 वर्षेपासून कलर काम करत आहे. केमिकल कलर देतांना डोळ्याला, हाताला त्रास जाणवतो. मात्र, वैदिक रंग देताना प्रसन्न वाटतं. कुठलाही त्रास जाणवत नसल्याचे रंगकाम करणाऱ्या कारागिराने सांगितलं.
घरात स्वछ हवा मिळते - मी रिसेलचे घर घेतल्यावर घराला रंग देण्याचं ठरवलं. अशात मला वैदिक रंगाबद्दल माहिती मिळाली. या रंगाचे फायदे जाणून घेतल्यानंतर मी माझ्या घराला वैदिक रंग दिला. या रंगामुळे घरात प्रसन्नता वाटते. स्वच्छ हवा, घरात गारवा जाणवतो, विशेष म्हणजे पाली, झुरळं किटक घरात येत असं एका महिलेने सांगितलं.
कमी किंमत - रेग्युलर पेंटला 20 लिटर साठी 2100 ते 2700 रुपये मोजावे लागतात. तर वैदिक रंग हा 1600 रुपयात 20 लिटर मिळतो.
हेही वाचा - Valse Patil On Morcha : शांतता राखा, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन