नाशिक - मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे या राज्यमहामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली होती. तर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या रेल्वे ओव्हरब्रिजचा एक भाग मोडकळीस आला असल्याचे वृत्त ईटीव्ही भारत ने प्रसारित केले होते. याची दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांनी दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला चांगलेच धारेवर धरले होते. यामुळे खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित कारवाई करत या पुलाची दुरुस्ती सुरू केली आहे.
हेही वाचा - नाशिकच्या देवळा येथील अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय मदत करा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
एमएमकेआयपी लिमिटेड अर्थात मालेगांव मनमाड कोपरंगाव इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट कंपनी लिमिटेड या कंपनीच्या वतीने इंदूर-पुणे या राज्यमहामार्गावरील मालेगाव ते कोपरगाव हा भाग बीओटी तत्त्वावर घेतला होता. सुरवातीला हा रस्ता बनवून त्यावर टोल आकराणी करण्यात आली. त्यांनतर एकदाही या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले नाही. केवळ माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या येण्याच्या वेळी या रस्त्याची डागडुजी करुन खड्डे भरून दुभाजकाना रंग देण्यात येतो. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे.
हेही वाचा - नाशिकमधील अपघातग्रस्तांना तातडीने आवश्यक ती मदत द्या - पालकमंत्री छगन भुजबळ
मनमाड ते मालेगाव आणि येवला या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात तर अक्षरशः गाडी चालविणे म्हणजे कसरतच असते. या खड्डयांमुळे रोज अपघात होत असून यामुळे अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एमएमकेआयपी या कंपनीकडून 'टोलधाड' सुरूच असुन १ जुलै पासून टोलमध्ये 15 टक्के वाढ करण्यात आली आहे. मुळात टोल घेतल्यास देण्यात येणाऱ्या सुविधांचा अभाव असून या टोल कंपनीकडे स्वतःचे अग्निशमन वाहन रुग्णवाहिका तसेच क्रेन देखील नाही. या रस्त्यावर अपघात झाल्यानंतर मनमाड, येवला किंवा कोपरगाव येथील पालिकेच्या किंवा खाजगी वाहनांची मागणी करून परिस्थिती हाताळावी लागत आहे.
हेही वाचा - नाशिकच्या रोकडपाडात मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन युवकांचा मृत्यू
मनमाड ते येवला हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. मात्र, त्याला अजूनही मुहूर्त लागला नाही. त्यामुळे या रस्त्यावर पडलेले खड्डे प्रवासी वाहन धारक, जनतेसह, गांवातील नागरिकांना त्रासदायक बनले होते. राष्ट्रीय महामार्ग मंजूर असूनही काम होत नसल्याने आणि राज्य शासन नूतनीकरणाच्या नावाखाली कामाला निधी देत नसल्याने जनतेला मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत ईटीव्ही भारतने वृत्त प्रसारित करताच पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा विचित्र अपघात! दोन्ही वाहने विहिरीत कोसळल्याने 25 ठार
दरम्यान, ईटीव्हीने वृत्त देताच खासदार भारती पवार यांनी दखल घेत संबंधित विभागाच्या बैठका घेऊन तत्काळ सुधारणा करण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यामुळे या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून हे काम सुरू करण्यात आले आहे.