नाशिक - राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून येण्यासाठी येवला व्यापारी महासंघाच्या वतीने महावीर जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हेही वाचा - गोव्याहुन विक्रीसाठी येणारा एक कोटींचा अवैध मद्यसाठा नाशिकमध्ये जप्त
रक्ताचा तुटवडा भरून निघण्यासाठी रक्तदान शिबीर
कोरोना महामारीचे जागतिक संकट भारतासह संपूर्ण राज्यात सद्या थैमान घालत असून याची सर्वात जास्त झळ महाराष्ट्रालाही पोहचत आहे. अशातच रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोना संकट काळात व्यापाऱ्यांची प्रचंड हेळसांड झाली. उद्योग धंदे ठप्प झाल्याने व्यापारी वर्ग हवालदिल झाला. मात्र, अशातही व्यापारी वर्गाने खचून न जाता माणुसकीचे एक पाऊल पुढे टाकले आहे. येवला व्यापारी महासंघाच्या वतीने प्रशासनाला सहकार्य, तसेच रुग्णाला मदत होईल या करिता येवला व्यापारी महासंघाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
रक्तदानास महिलांचाही सहभाग
या रक्तदान शिबिरात तरुणींसह महिलांनीही आपला सहभाग नोंदवत रक्तदान केले. राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून निघावा, या करता हे रक्तदान शिबीर आयोजित केले, अशी प्रतिक्रिया व्यापारी महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवणे यांनी दिली.
हेही वाचा - नाशिक : ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे मिळलेला साठा अर्धा दिवस पुरेल एवढाच