ETV Bharat / state

'मंदिरे उघडावी,' या मागणीसाठी 13 ऑक्टोबरला भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन

अनलॉकच्या प्रक्रियेत शासनाने राज्यभरातील बिअर बार, हॉटेल्स सुरू केली. मात्र, अद्याप मंदिरे खुली करण्याबाबत शासनाने कुठलाही निर्णय घेतला नसल्याने राज्यातील मंदिरे लवकरात लवकर उघडण्यात यावी, या मागणीसाठी भाजपतर्फे येत्या 13 ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन होणार आहे.

author img

By

Published : Oct 7, 2020, 4:27 PM IST

Updated : Oct 7, 2020, 5:31 PM IST

मंदिरे उघडावी मागणीसाठी भाजप आंदोलन न्यूज

नाशिक - राज्य शासनाने राज्यातील बिअर बार सुरू केले. मात्र, मंदिरे अद्यापही बंद असल्याने भाजप आक्रमक झाला आहे. भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने 13 ऑक्टोबरला राज्यभरातील प्रमुख मंदिरांबाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी बुधवारी पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

'मंदिरे उघडावी,' या मागणीसाठी 13 ऑक्टोबरला भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 'वंचित'चे तहसील कार्यालयासमोर चटणी-भाकर आंदोलन

अनलॉकच्या प्रक्रियेत शासनाने राज्यभरातील बिअर बार, हॉटेल्स सुरू केली. मात्र, अद्याप मंदिरे खुली करण्याबाबत शासनाने कुठलाही निर्णय घेतला नसल्याने राज्यातील मंदिरे लवकरात लवकर उघडण्यात यावी, या मागणीसाठी भाजपतर्फे येत्या 13 ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. 13 ऑक्‍टोबरला राज्यातील सर्व प्रमुख मंदिरांबाहेर भजन-कीर्तन अध्यात्मिक पाठ करून साधू-संत भाविक आणि विविध संघटनांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच, राज्य शासनावर त्यांनी सडकून टीकाही केली आहे.

दरम्यान, या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांनीही सहभागी होण्याचे आवाहन भोसले यांनी या वेळी केले. राज्यातील मंदिरे सुरू व्हावी, यासाठी भाजप आक्रमक झाला आहे. 13 ऑक्टोबरला करण्यात येणार आंदोलन यशस्वी होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - "कोविड रुग्णांच्या उपचारांना प्राधान्य, उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत होणार"

Last Updated : Oct 7, 2020, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.