ETV Bharat / state

खासदार चंद्रकांत हंडोरेंना अटक करा; माजी खासदार राहुल शेवाळेंची मागणी - MP Chandrakant Handore

राहुल शेवाळे यांनी प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश हंडोरेला फरार होण्यासाठी त्याचे वडील खासदार चंद्रकांत हंडोरेंनी मदतीचा आरोप करत त्यांना अटक करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय.

Chandrakant Handore and Rahul Shewale
चंद्रकांत हंडोरे आणि राहुल शेवाळे (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2024, 6:38 PM IST

मुंबई - चेंबूर येथे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील अपघातात गंभीर जखमी झालेल्या गोपाळ आरोटे या तरुणाची चेंबूरच्या झेन रुग्णालयात जाऊन माजी खासदार राहुल शेवाळे यांनी भेट घेतली आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राहुल शेवाळे यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश हंडोरेला गाडी लपविण्यासाठी आणि फरार होण्यासाठी त्याचे वडील खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी मदत केल्याचा आरोप करत त्यांना अटक करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. तसेच या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी व्हावी, असंही राहुल शेवाळे म्हणालेत.

मुलाला वाचविण्यासाठी वडिलांचा पुढाकार : पत्रकारांशी संवाद साधताना राहुल शेवाळे म्हणाले की, गोपाळ आरोटे यांच्या अपघाताची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोटे यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मी इथे आलो होतो. आरोटे यांच्या उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत. या हिट अँड रन अपघाताच्या घटनेनंतर आपल्या मुलाला वाचविण्यासाठी आरोपी गणेश यांचे वडील खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रकांत हंडोरे यांच्या सांगण्यावरून अपघातग्रस्त गाडी ही चेंबूरच्या महाविद्यालयात लपविण्यात आली आणि गणेश हंडोरेला फरार घोषित करण्यात आले. या कारणाने या अपघाताची सत्यता पडताळून पाहण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करीत आहे.

वडिलांवरसुद्धा गुन्हा दाखल : राहुल शेवाळे पुढे म्हणाले की, या पूर्वीच्या हिट अँड रन प्रकरणात ज्याप्रमाणे आरोपीच्या वडिलांवरसुद्धा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली, तोच नियम या प्रकरणात लावून खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी मी करीत आहे. अशा दुर्दैवी घटनांमध्ये केवळ राजकारण करून नेहमी आवाज उठवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या दुर्घटनेत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशा शब्दात राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

काय आहे प्रकरण? : शुक्रवारी ४ ऑक्टोबरच्या रात्री चेंबूरच्या खारदेव नगर परिसरातून गोपाळ आरोटे हे आपल्या दुचाकीवरून जात होते. यावेळी गोपाळ आरोटे यांना गणेश चंद्रकांत हंडोरे यांच्या चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात गोपाळ आरोटे गंभीररीत्या जखमी झाले. तर गणेश हंडोरे यांनी घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला. तसेच मिळालेल्या माहितीनुसार गणेश हंडोरे यांनी अपघातग्रस्त गाडी त्यांच्या चेंबूर पश्चिमेकडील महाविद्यालयाच्या परिसरात लपवून फरार होण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेर त्यांना पोलिसांनी अटक केली असून, ते सध्या उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल आहेत.

हेही वाचाः

मोदींच्या हस्ते जलपूजन झालेलं अरबी समुद्रातील शिवस्मारक कुठंय? संभाजीराजे छत्रपती घेणार शोध - Chhatrapati Sambhaji Raje

आगीची घटना अतिशय दुर्दैवी, प्रत्येक मृतकाला सरकारकडून 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा - Mumbai Chembur Fire

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.