नवी दिल्ली : महिला टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेत आज (6 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने आले. या सामन्यात पाकिस्तान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 8 गडी गमावून 105 धावा केल्या. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. पाकिस्तानला 20 षटकात 8 विकेट गमावत केवळ 106 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतानं हे आव्हान 18.5व्या षटकांत पूर्ण करत यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला.
India bring their Women's #T20WorldCup 2024 campaign back on track with a win over Pakistan 👏#WhateverItTakes #INDvPAK
— ICC (@ICC) October 6, 2024
📝: https://t.co/haYMwbKe4X pic.twitter.com/Y4608fYHjZ
पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी कोसळली : पाकिस्तान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाकडून निदा दारनं सर्वाधिक 28 धावा केल्या. तिच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 20 धावांची वैयक्तिक धावसंख्या गाठता आली नाही. या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी कोसळली. मुनिबानं 17, सिद्रा अमीनने आठ, ओमामा सोहेलनं 3, आलिया रियाझनं 4, फातिमा सनानं 13 धावा केल्या. सईदा आणि नशरा या अनुक्रमे 14 आणि 6 धावांवर नाबाद राहिल्या. भारताने पाकिस्तानला 105 धावांवर रोखलं. भारताकडून अरुंधती रेड्डीनं सर्वाधिक 3 आणि श्रेयंका पाटीलनं 2 तर रेणुका, दीप्ती आणि आशा यांनी 1 विकेट घेतली.
Good win for the Women in Blue against Pakistan in the #T20WorldCup! Our girls used the conditions to perfection in the first half, and a special mention to @reddyarundhati for her 3-wicket haul! On to the next fixture, where we aim to secure back-to-back wins! 🇮🇳 @BCCIWomen pic.twitter.com/AtJaB7bj7G
— Jay Shah (@JayShah) October 6, 2024
हरमनप्रीत कौरची दमदार खेळी : भारतीय संघ पाकिस्ताननं दिलेल्या 106 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला स्मृती मानधनाच्या रुपानं पहिला धक्का बसला. स्मृती 7 धावा करत तंबूत परतली. त्यानंतर शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रीगेझ यांनी दमदार फटकेबाजी केली. शेफालीनं 32 धावांची खेळी साकारली. तर जेमिमा रॉड्रीगेझ 23 धावा करत बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौरनं शेवटपर्यंत लढा दिला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. संघाला विजयासाठी 2 धावांची गरज असताना तिला दुखापत झाली. त्यामुळं तिला मैदान सोडून जावं लागलं. हरमनप्रीतनं 29 धावा केल्या.
#TeamIndia are back to winning ways!
— BCCI Women (@BCCIWomen) October 6, 2024
A 6-wicket win against Pakistan in Dubai 👏👏
📸: ICC
Scorecard ▶️ https://t.co/eqdkvWWhTP#T20WorldCup | #INDvPAK | #WomenInBlue pic.twitter.com/0ff8DOJkPM
पाकिस्तानविरुद्ध भारतीय महिला संघाचा वरचष्मा : भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यात आतापर्यंत एकूण 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारतीय संघानं 13 आणि पाकिस्तानी महिला संघानं फक्त 3 जिंकले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघ टी-20 मध्ये पाकिस्तानपेक्षा खूप पुढं आहे आणि वरचढ आहे. तर महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 8 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारतीय संघानं 6 तर पाकिस्तानने 2 सामने जिंकले आहेत. शेवटच्या वेळी दोन्ही संघ 2022 च्या टी-20 विश्वचषकात आमनेसामने आले होते, तेव्हा भारतीय संघानं 7 विकेट्सने सामना जिंकला होता.
हेही वाचा
- भारताची युवा ब्रिगेड दाखवणार जलवा... बांगलादेशविरुद्ध पहिला T20 सामना 'इथं' दिसणार लाईव्ह - IND vs BAN 1st T20I LIVE IN INDIA
- कुठून येतो इतका कॉन्फिडन्स? सामन्याच्या दोन दिवस आधीच प्लेइंग 11 जाहीर - England Cricket Team
- मुंबईचा 27 वर्षांचा दुष्काळ संपला; सामना अनिर्णित राहूनही 'अजिंक्य' नेतृत्वाखाली कोरलं इराणी चषकावर नाव - Mumbai Won Irani Cup