ETV Bharat / state

मनसेच्या खुल्या पाठींब्याने महापालिकेच्या स्थायी समितीची धुरा भाजपकडे - नाशिक जिल्हा बातमी

विरोधकांनी अनेक प्रयत्न करूनही आपसातील एकोप्या अभावी स्थायी समितीच्या सभापतिपदी भाजपचे गणेश गीते यांची अपेक्षेनुसार बिनविरोध निवड झाली आहे.

BJP
भाजप
author img

By

Published : Mar 9, 2021, 5:15 PM IST

Updated : Mar 9, 2021, 6:48 PM IST

नाशिक - विरोधकांनी अनेक प्रयत्न करूनही आपसातील एकोप्या अभावी नाशिक महापालिकेची स्थायी समिती आपल्याच ताब्यात ठेवण्यात सत्तारुढ भाजपला यश आले आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदी भाजपचे गणेश गीते यांची अपेक्षेनुसार बिनविरोध निवड झाली आहे.

मनसेच्या खुल्या पाठींब्याने महापालिकेच्या स्थायी समितीची धुरा भाजपकडे

मनसेच्या एका सदस्यांचे निर्णयाक मत भाजपच्या पारड्यात

नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी भाजपचे नगरसेवक गणेश गीते यांची पुन्हा एकदा नियुक्ती झाली आहे. सलग दुसऱ्यांदा सभापती होणारे गणेश गीते हे तिसरे सभापती ठरले आहे. स्थायी समिती सभापती पदासाठी सोमवारी (दि. 8 मार्च) अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. यावेळी गणेश गीते यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने गणेश गीते हे स्थायी समिती सभापती पदाचे निश्चित उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले होते. मंगळवारी (दि. 9 मार्च) सकाळी याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सुरुवातीला शिवसेनेने सभापतीपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र, या प्रक्रियेच्या सुरुवातीलाच मनसेने भाजपच्या बाजूने जाणे पसंत केल्यामुळे अखेर शिवसेनेने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली. यामुळेच स्थायी समिती सभापतीपदी पदाची माळ पुन्हा एकदा गणेश गीते यांच्या गळ्यात पडली आहे.

स्थायी समिती निवडणुकीत मनसे किंगमेकर

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेने मनसेचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी शिवसेनेसोबत कशासाठी जायचे म्हणून या निवडणुकांमध्ये किंगमेकर ठरलेल्या मनसेने राज्य पातळीवरून भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मनसेचे नगरसेवक सलीम शेख यांनी सांगितले.

मनसे-भाजप युतीचे नाशिक पॅटर्नने पाहिले पाऊल

नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापति पदाच्या निवडणुकीत निमित्ताने राज्यामध्ये भाजप आणि मनसे युतीचे हे पहिले पाऊल मानले जात आहे. मागील चार वर्षे स्थायी समितीवर भाजपचे वर्चस्व होते. पण, एक सदस्य कमी झाल्याने यावर्षी सभापतिपद भाजपला राखण्यात यश येनार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता मात्र माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शेवटच्या क्षणी ते सभापति पदासाठीचा उमेदवार अशी सर्व खेळी हाती घेतल्याने भाजपाची सरशी या निवडणुकांमध्ये झाल्याचं बोलले जात आहे.

शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय

आज जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत गीते यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.आज सकाळी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे पाच सदस्य सभागृहात आलेच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तसेच भाजपला समर्थन करणारे मनसेचे सदस्य उपस्थित होते. गीते यांचा एकमेव अर्ज असल्याने अखेरीस जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी गीते यांची निवड झाल्याचे घोषित केले.स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी 8 सदस्य असून मनसेने भाजपला पाठिंबा दिला त्यामुळे अडचण नव्हती. परंतु शिवसेनेने सुरुवातीला प्रतिष्ठेचा प्रश्न केला पण अन्य विरोधकांनी साथ दिली नाही. त्यामुळे घोडेबाजार वाढत असल्याचे कारण देऊन शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा - ...म्हणून महिला दिनी युवा स्वाभिमानी महिला पक्षाचा रास्ता रोको

हेही वाचा - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात कठोर निर्बंध

Last Updated : Mar 9, 2021, 6:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.